उत्तर पुणे जिल्ह्यातील जुन्नर, खेड, आंबेगाव, शिरूर अशा तालुक्यांतील गावांत बिबट्याच्या दहशतीने शेतकरी वर्ग घराबाहेर पडायला घाबरत असताना आता मायानगरी मुंबईतही बिबट्याचा मुक्त संचार दिसून आला. मुंबईतल्या गोरेगाव पूर्व भागात बिबट्याचा संचार होत असल्याचा व्हिडीओ समाज माध्यमांवर व्हायरल होत आहे. त्यामुळे गोरेगावकर भयभीत झाले आहेत. दिंडोशी विधानसभा क्षेत्रातील न्यू दिंडोशी रॉयल हिल्स सोसायटीमध्ये संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातून रात्री अपरात्री बिबट्याचा वावर पाहायला मिळत आहे. बिबट्याच्या मुक्त संचाराचा सीसीटीव्ही व्हिडीओ समोर आला आहे.
मुंबई शहरात बिबट्याचा वावर? व्हि़डिओ व्हायरल
एकीकडे ग्रामीण भागात बिबट्यांनी उच्छाद मांडला असताना आता मुंबईत देखील बिबट्याच्या दर्शनाने खळबळ उडाली आहे. मुंबईतील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात बिबट्यांचा अधिवास असला तरी त्यांचा उपद्रव अलिकडे थांबला होता. पंरतू आता पुन्हा एकदा मुंबईच्या पश्चिम उपनगरातील दिंडोशी विधानसभा क्षेत्रातील न्यू दिंडोशी रॉयल हिल्स सोसायटीमध्ये बिबट्याचा संचार सुरु असल्याचे उघडकीस आले आहे. या सोसायटीच्या सीसीटीव्हीत संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातून रात्री अपरात्री बिबट्याचा वावर पाहायला मिळाला आहे.
या संदर्भात बिबट्याचे मुंबईत संभाव्य हल्ले रोखण्यासाठी आमदार सुनील प्रभू यांनी वनमंत्री गणेश नाईक यांना पत्र लिहिले आहे. बिबट्याच्या या मुक्त संचारामुळे या ठिकाणी राहणाऱ्या लोकांमध्ये भीतीचे आणि असुरक्षितेचे वातावरण निर्माण झाले आहे. आधी या भागात संरक्षक जाळ्या बसवण्यात आल्या होत्या. मात्र या जाळ्या ओलांडून हा बिबट्या सोसायटीमध्ये येत असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे बिबट्याचे संभाव्य हल्ले आणि जीवितहानी रोखण्यासाठी तातडीने उपाययोजना करण्याचे निर्देश द्यावेत, असे पत्र आमदार सुनील प्रभू यांनी मंत्री गणेश नाईक यांना लिहिले आहे.
वनविभागाच्या विरोधात नाराजी; अनेक प्रश्न उपस्थित
बिबट्याचे मुंबईत संभाव्य हल्ले रोखण्यासाठी आमदार सुनील प्रभू यांनी वनमंत्री गणेश नाईक यांना पत्र लिहिले आहे. बिबट्याच्या मुक्त संचारामुळे गोरेगावात राहणाऱ्या लोकांमध्ये भीतीचे आणि असुरक्षितेचे वातावरण आहे. याआधी या भागात संरक्षण जाळ्या बसविण्यात आल्या होत्या. मात्र या जाळ्या ओलांडून बिबट्या सोसायटीमध्ये शिरत आहे. त्यामुळे बिबट्याचे संभाव्य हल्ले आणि जीवितहानी रोखण्यासाठी तातडीने उपाययोजना करण्याचे निर्देश द्यावेत, असे पत्र आमदार सुनील प्रभू यांनी मंत्री गणेश नाईक यांना पाठवला आहे.





