महाराष्ट्रातील ‘या’ शहरांत 3 दिवस बाजार, मद्यविक्री पूर्ण बंद; नेमकं काय घडलंय ?

महाराष्ट्रात स्थानिक निवडणुकांमुळे १, २ आणि ३ डिसेंबरला राज्यातील संबंधित नगरपरिषदा व नगरपंचायत क्षेत्रांत मद्यविक्री बंद राहणार आहे. बार, दारू दुकानं, बिअर शॉप्स व वाईन शॉप्स पूर्णपणे बंद ठेवण्याचे आदेश. अमरावती शहरात देखील याचा परिणाम दिसून येणार आहे.

सध्या राज्यभरात निवडणुकीचा जोर आहे. येणाऱ्या २ डिसेंबरला राज्यातील २४६ नगरपरिषदा आणि ४२ नगरपंचायतीच्या निवडणुकांसाठी मतदान होणार आहे. त्यानंतर ३ डिसेंबरला मतमोजणी आहे. त्यामुळे राज्यातील मतदानाच्या ठिकाणी तीन दिवस ड्राय डे जाहीर करण्यात आला आहे. त्यामुळे मद्यप्रेमींचा या तीन दिवस ग्लास रिकामाच राहणार आहे. निवडणूक असलेल्या जिल्ह्यातील संबंधित नगरपरिषदा/नगरपंचायत निर्वाचन क्षेत्रातील सर्व बार अँड रेस्टॉरंट, वाईन शॉप, बिअर शॉपी, माडी विक्री, देशी, विदेशी सर्वच बंद असणार आहे. संपूर्ण तीन दिवस म्हणजेच १ डिसेंबर ते ३ डिसेंबर पर्यंत बंद ठेवण्याचे आदेश आहे. काही जिल्ह्यात मतमोजणीच्या दिवशी सर्व प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत मद्यविक्री बंद राहिल. त्यानंतर मात्र काही जिल्ह्यांमध्ये मद्यविक्री सुरू होणार असल्याची माहिती आहे.

अमरावतीमध्ये 1 ते 3 डिसेंबर मद्यविक्री बंद

नगरपरिषद व नगरपंचायत सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात तीन दिवस कडक बंदोबस्त राहणार आहे. 1 ते 3 डिसेंबर या कालावधीत शहर व नगरपंचायती हद्दीत देशी-विदेशी मद्यविक्री पूर्णपणे बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांनी जारी केले आहेत. 2 डिसेंबरला मतदान आणि 3 डिसेंबरला मतमोजणी होत असल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे. उत्पादन शुल्क विभागाला दिलेल्या निर्देशांनुसार, निवडणूक काळात मद्याची अवैध विक्री होणार नाही, यासाठी विशेष पथके तैनात असणार आहेत. सर्व सरकारी परवाना असलेल्या मद्य विक्रेत्यांना बंदाबाबत लेखी नोटीस देऊन तिची नोंद अभिलेखात ठेवण्याचे आदेश निरीक्षकांना देण्यात आले आहेत. बंदीच्या काळात एकही अगदी परवाना असलेलं मद्य विक्री केंद्र देखील सुरू असल्यास संबंधितांना वैयक्तिकरीत्या जबाबदार धरण्यात येईल, असेही स्पष्ट करण्यात आले आहे.

महाराष्ट्रात कुठे अन् काय-काय बंद असेल ? 

निवडणूक असलेल्या जिल्ह्यातील संबंधित नगरपरिषदा/नगरपंचायत निर्वाचन क्षेत्रातील सर्व देशी/ विदेशी किरकोळ मद्य विक्री व माडी विक्री अनुज्ञप्ती), बार अँड रेस्टॉरंट, वाईन शॉप, बिअर शॉपी १ डिसेंबर २०२५ रोजी (मतदानाच्या आदला दिवस), २ डिसेंबर २०२५ रोजी (मतदानाचा दिवस) आणि ३ डिसेंबर २०२५ रोजी (मतमोजणीचा दिवस) या तीन दिवशी संबंधित नगरपरिषदा/नगरपंचायत निर्वाचन क्षेत्रातील सर्व देशी/विदेशी किरकोळ मद्य व माडी विक्री अनुज्ञप्ती संपूर्ण दिवस मद्य विक्रीस बंद ठेवण्याचे आदेश आहे. काही जिल्ह्यात मतमोजणीच्या दिवशी (३ डिसेंबर) सर्व प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत मद्यविक्री बंद राहिल. त्यानंतर मात्र काही जिल्ह्यांमध्ये मद्यविक्री सुरू होणार असल्याची माहिती आहे.


About Author

Rohit Shinde

Other Latest News