रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया दरवर्षी राज्य सरकारांच्या सहकार्याने सर्व बँकांची सुट्ट्यांची यादी तयार करते आणि ती त्यांच्या अधिकृत वेबसाइटवर सार्वजनिक करते. देशभरातील सर्व सरकारी आणि खाजगी बँका दर रविवारी आणि महिन्याच्या दुसऱ्या आणि चौथ्या शनिवारी बंद असतात. या व्यतिरिक्त ज्या सुट्ट्या बँकांना असतात, त्यांची यादी समोर येत असते. डिसेंबर महिन्यात देशभरातील बँकांच्या सुट्ट्या नेमक्या कशा राहतील, त्याबाबत अधिक सविस्तर जाणून घेऊ…
डिसेंबर 2025 मध्ये सहा वीकेंड असल्याने आठवड्याच्या शेवटी सुट्ट्या असतील. बँकांच्या सुट्ट्यांमध्ये 13 तारखेला दुसरा शनिवार आणि 27 तारखेला चौथा शनिवार समाविष्ट आहे. 7, 14, 21 आणि 28 तारखेला रविवार सुट्टी असेल. या सुट्ट्या संपूर्ण भारतात लागू होतील. तर 25 तारखेला ख्रिसमची सुट्टी असणार आहे. महाराष्ट्रातही या सर्व दिवशी बँकांना सुट्ट्या असणार आहेत.

बँकांच्या सुट्ट्यांची सविस्तर यादी
- 1 डिसेंबर, सोमवार – इटानगर आणि कोहिमामध्ये उद्घाटन दिन / आदिवासी श्रद्धा दिन
- 3 डिसेंबर, बुधवार – गोव्यात सेंट फ्रान्सिस झेवियर्स दिन
- 7 डिसेंबर, रविवार – नियमित साप्ताहिक सुट्टी
- 12 डिसेंबर, शुक्रवार – शिलाँगमध्ये पा तोगन नेंगमिंजा संगमा यांची पुण्यतिथी
- 13 डिसेंबर, शनिवार – देशभरात दुसरा शनिवार
- 14 डिसेंबर, रविवार – साप्ताहिक सुट्टी
- 18 डिसेंबर, गुरुवार – शिलाँगमध्ये यू सोसो थाम यांची पुण्यतिथी
- 19 डिसेंबर, शुक्रवार – पणजी (गोवा) मध्ये गोवा मुक्ती दिन
- 20, 21 आणि 22 डिसेंबर – नवीन वर्ष आणि लोसुंग / नामसुंग उत्सवामुळे सिक्कीममध्ये सतत सुट्ट्या
- 21 डिसेंबर, रविवार – साप्ताहिक सुट्टी
- 24 डिसेंबर, बुधवार – ऐझवाल, कोहिमा येथे नाताळाची संध्याकाळ आणि शिलाँग
- 25 डिसेंबर, गुरुवार – देशभरात नाताळ (ख्रिसमस)
- 26 डिसेंबर, शुक्रवार – ऐझॉल, कोहिमा येथे सुट्ट्या आणि शिलाँगमध्ये ख्रिसमस उत्सवामुळे सुट्टी
- 27 डिसेंबर, शनिवार – कोहिमामध्ये नाताळ; तसेच देशभरात चौथा शनिवार
- 28 डिसेंबर, रविवार – साप्ताहिक सुट्टी
- 30 डिसेंबर, मंगळवार – शिलाँगमध्ये यू किआंग नांगबाह यांची पुण्यतिथी
- 31 डिसेंबर, बुधवार – ऐझॉल आणि इंफाळमध्ये नवीन वर्षाची संध्याकाळ / इमोइनू इरात्पा











