Bank Holiday: डिसेंबरमध्ये बँका इतके दिवस बंद राहणार ; कुठे आणि कधी कामकाज बंद? जाणून घ्या

Rohit Shinde

रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया दरवर्षी राज्य सरकारांच्या सहकार्याने सर्व बँकांची सुट्ट्यांची यादी तयार करते आणि ती त्यांच्या अधिकृत वेबसाइटवर सार्वजनिक करते. देशभरातील सर्व सरकारी आणि खाजगी बँका दर रविवारी आणि महिन्याच्या दुसऱ्या आणि चौथ्या शनिवारी बंद असतात. या व्यतिरिक्त ज्या सुट्ट्या बँकांना असतात, त्यांची यादी समोर येत असते. डिसेंबर महिन्यात देशभरातील बँकांच्या सुट्ट्या नेमक्या कशा राहतील, त्याबाबत अधिक सविस्तर जाणून घेऊ…

डिसेंबरमध्ये 18 दिवस बँका बंद

2025 मधील शेवटचा महिना असलेल्या डिसेंबरमध्ये बँका 18 दिवस बंद राहणार आहेत. विविध राज्यातील सण आणि उत्सवांच्या निमित्तानं बँका त्या ठिकाणी बंद असतील. तर, साप्ताहिक सुट्टीमुळं बँका 6 दिवस बंद राहणार आहेत. डिसेंबरमध्ये ख्रिसमस शिवाय इतर राज्यातील स्थानिक सणांमुळं बँका बंद राहतील. डिसेंबर महिन्यात बँकेतील काही कामांचं नियोजन करत असाल तर तुम्हाला बँकांना सुट्टी कधी आहे. हे माहिती असणं आवश्यक आहे. डिसेंबरमध्ये बँकेत चेक जमा करणे, डीडी तयार करणे किंवा कर्जासंदर्भातील काही कागदपत्रांची पूर्तता करायची असेल तर तुम्हाला बँकांना किती दिवस सुट्टी आहे हे माहिती असणं आवश्यक आहे.

बँकांच्या सुट्ट्यांची सविस्तर यादी

7 डिसेंबर, 14 डिसेंबर, 21 डिसेंबर, 28 डिसेंबरला रविवार असून साप्ताहिक सुट्टी असेल. तर, 13 डिसेंबर आणि 27 डिसेंबरला दुसऱ्या आणि चौथ्या शनिवार निमित्त बँकांना सुट्टी असेल.

डिसेंबर इंडिजिनस फेथ डे (अरुणाचल प्रदेश )

3 डिसेंबर सेंट फ्रान्सिस झेविअर उत्सव (गोवा)

12 डिसेंबर पा तोगन नेंगमिंजा संगमा दिवस (मेघालय)

18 डिसेंबर गुरु घासीदास जयंती (छत्तीसगड), यू सोसो थम पुण्यतिधी (मेघालय)

19 डिसेंबर गोवा मुक्ती दिवस (गोवा)

24 डिसेंबर ख्रिसमस ईव (मेघालय, मिझोरम)

25 डिसेंबर ख्रिसमस (बहुतांश राज्यात बँकांना सुट्टी)

26 डिसेंबर : ख्रिसमस सेलीब्रेशन (मेघालय, मिझोरम, तेलंगाणा) शहीद उधमसिंह जयंती (हरियाणा)

27 डिसेंबर गुरु गोविंद सिंह जयंती (हरियाणा, पंजाब, हिमाचल प्रदेश )

30 डिसेंबर यू कियांग नांगबाह दिवस (मेघालय) तामू लोसर (सिक्कीम)

31 डिसेंबर नववर्ष स्वागत (मिझोरम, मणिपूर )

बँकांना सुट्टी, ऑनलाईन व्यवहार करा!

दिवाळीच्या काळात बँकांना सुट्टी असल्यामुळे अनेक आर्थिक व्यवहारांमध्ये अडथळे येतात. अशावेळी ऑनलाईन व्यवहार हा उत्तम पर्याय ठरतो. इंटरनेट बँकिंग, मोबाईल बँकिंग, यूपीआय, गूगल पे, फोन पे, पेटीएम यांसारख्या डिजिटल माध्यमांद्वारे पैसे पाठवणे किंवा बिल भरणे अत्यंत सोपे झाले आहे. ग्राहकांनी या सेवांचा वापर करून वेळ आणि श्रम दोन्ही वाचवू शकतात. तसेच, सुट्ट्यांच्या काळात एटीएममध्ये रोकड उपलब्ध नसेल तर ऑनलाईन व्यवहार अधिक सोयीचे ठरतात. मात्र, फसवणुकीपासून बचावासाठी सुरक्षित व्यवहार करणे आवश्यक आहे. त्यामुळे बँक सुट्टीतही व्यवहार थांबत नाहीत, फक्त माध्यम बदलते.

ताज्या बातम्या