Maharashtra Special Train: महाराष्ट्रातील या 10 स्टेशनवरून धावणार स्पेशल ट्रेन

रेल्वेची अतिरिक्त गर्दी टाळण्यासाठी प्रशासनाने पुण्यातील हडपसर पासून नांदेड पर्यंत नवीन स्पेशल रेल्वे वाडी सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. नांदेड वरून पुण्याला ये जा करणाऱ्या प्रवाशाची संख्या जास्त आहे. हे पाहता प्रशासनाने ही नवीन स्पेशल ट्रेन सुरू केली आहे.

Maharashtra Special Train : महाराष्ट्रातील रेल्वे प्रवाशांसाठी मोठी आनंदाची बातमी आहे. रेल्वेची अतिरिक्त गर्दी टाळण्यासाठी प्रशासनाने पुण्यातील हडपसर पासून नांदेड पर्यंत नवीन स्पेशल रेल्वे वाडी सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. नांदेड वरून पुण्याला ये जा करणाऱ्या प्रवाशाची संख्या जास्त आहे. हे पाहता प्रशासनाने ही नवीन स्पेशल ट्रेन सुरू केली आहे. रेल्वेच्या या निर्णयामुळे प्रवाशांना मोठा फायदा होईल तसेच गर्दी सुद्धा आटोक्यात राहणार आहे.

कसं असेल वेळापत्रक? (Maharashtra Special Train)

हडपसर – नांदेड विशेष रेल्वेगाडी 18 आणि 25 नोव्हेंबर 2025 रोजी चालवली जाणार आहे. गाडीच्या वेळापत्रका बद्दल सांगायचं झाल्यास, ट्रेन क्रमांक ०७६०७ नांदेड – हडपसर स्पेशल ही मंगळवारी १८.११.२०२५ आणि २५.११.२०२५ नांदेड येथून सकाळी ८:३० वाजता सुटेल आणि त्याच दिवशी रात्री २१:४० वाजता हडपसर येथे पोहोचेल. तर ट्रेन क्रमांक ०७६०८ हडपसर – नांदेड स्पेशल ही मंगळवारी ( १८.११.२०२५ आणि २५.११.२०२५) रात्री २२:५० वाजता हडपसर येथून निघेल आणि दुसऱ्या दिवशी दुपारी १२:१५ वाजता नांदेड रेल्वे स्थानकावर पोहोचेल. नांदेड हे मराठवाड्यातील महत्त्वाचे शहर आहे. अशावेळी मराठवाड्यातील लोकांना पुण्यात येण्यासाठी ही स्पेशल ट्रेन अतिशय महत्त्वाची ठरणार आहे.

कोणकोणत्या स्थानकावर थांबणार??

या रेल्वेगाडीला (Maharashtra Special Train) पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील अनेक महत्त्वपूर्ण स्टेशनवर थांबा मंजूर करण्यात आला आहे. त्यानुसार, हडपसर ते नांदेड स्पेशल ट्रेन पूर्णा, परभणी, गंगाखेर, परळी वैजनाथ, लातूर रोड, लातूर, धाराशिव, बार्सी टाउन, कुर्डुवाडी आणि दौंड अशा 10 रेल्वे स्थानकावर थांबणार आहे. या रेल्वेमध्ये एकूण २२ एलएचबी कोच असतील ज्यामध्ये १ फर्स्ट एसी, २ एसी २-टायर, ६ एसी ३-टायर, १ पॅन्ट्री कार, ६ स्लीपर क्लास, ४ जनरल सेकंड क्लास आणि २ जनरेटर व्हॅनचा समावेश आहे.


About Author

Asavari Khedekar Burumbadkar

Other Latest News