Market Rates: महाराष्ट्रातील सोयाबीन आणि कांद्याच्या दराबाबत मोठी अपडेट; सोयाबीन तेजीत, कांद्याचा दर कमीच!

महाराष्ट्रातील बाजार समित्यांमध्ये बुधवारी सोयाबीन आणि कांद्याच्या दरामध्ये मोठी उलथापालथ पाहायला मिळाली. दरांमुळे काही ठिकाणी शेतकरी समाधानी असले, तर कांदा उत्पादकांमध्ये अद्यापही निराशा कायम आहे.

राज्यातील बाजार समित्यांमध्ये कांद्याची आवक चांगलीच वाढताना दिसत आहे. याचा फटका आता कांदा उत्पादक शेतकऱ्यांना बसणार आहे. कारण, दरांमध्ये घसरण होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. खरंतर एकीकडे राज्यामध्ये कांद्याच्या मागणीत वाढ जरी झाली असला तरी दुसरीकडे आवक देखील तेवढीच वाढत आहे. परिणाम कांद्याच्या दरामध्ये कोणतीही लक्षवेधी सुधारणा होताना दिसत नाही. त्यामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या अडचणी वाढताना दिसत आहेत.

महाराष्ट्रातील कांद्याच्या दराची सद्यस्थिती

राज्याच्या मार्केटमध्ये आज 1 लाख, 76 हजार 683 क्विंटल कांद्याची एकूण आवक झाली. यापैकी 92 हजार 537 क्विंटल सर्वाधिक आवक नाशिक बाजारात झाली. त्यास प्रतीनुसार कमीत कमी 355 ते जास्तीत जास्त 1822 रुपयांपर्यंत बाजार भाव मिळाला. तसेच सोलापूर मार्केटमध्ये आवक झालेल्या 711 क्विंटल कांद्यास 200 ते 3500 रुपये दरम्यान सर्वाधिक बाजारभाव मिळाला.

सोयाबीन उत्पादकांमध्ये दरामुळे समाधान

आता राज्यातील प्रमुख बाजार समित्यांमध्ये सोयाबीनच्या दरात काहीशी सुधारणा होताना दिसत आहे. या महिन्यात सध्याच्या दरांमध्ये साधारण वाढ होण्याचा अंदाज वर्तविला जात आहे. सध्या सोयाबीनला समाधानकारक दर मिळू लागला आहे. निर्यात, मागणीतील वाढ आणि हवामान अनुकूल राहिल्यामुळे दरात स्थिरता आणि काही ठिकाणी तेजी दिसून आल्याचे व्यापारी सांगतात.

राज्याच्या मार्केटमध्ये 99 हजार 093 क्विंटल सोयाबीनची एकूण आवक झाली. यापैकी लातूर मार्केटमध्ये सर्वाधिक 20 हजार 640 क्विंटल आवक राहिली. त्यास प्रतीनुसार 4285 ते 4773 रुपये प्रतिक्विंटल बाजार भाव मिळाला. तसेच अकोला मार्केटमध्ये आवक झालेल्या 5439 क्विंटल पिवळ्या सोयाबीनला प्रतीनुसार 4025 ते 5180 प्रमाणे सर्वाधिक सर्वाधिक बाजारभाव मिळाला.


About Author

Rohit Shinde

Other Latest News