एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना त्यांना महाराष्ट्रातील जनतेकडून मोठ्या प्रमाणावर प्रेम आणि पाठिंबा मिळाला. विशेषत: सर्वसामान्य नागरिकांपर्यंत पोहोचणारे निर्णय, जलद प्रशासन आणि जनतेच्या अडचणी थेट ऐकण्याची त्यांची शैली लोकांना भावली. ग्रामीण भागातील विकासकामे, शेतकरी-केंद्रित धोरणे, पायाभूत सुविधांसाठी घेतलेले निर्णय आणि जनतेसाठी उपलब्ध राहण्याची त्यांची प्रतिमा यामुळे अनेकांनी त्यांच्यावरील विश्वास दृढ केला. शिंदे यांनी घेतलेल्या काही लोकप्रिय उपक्रमांमुळे त्यांना वेगवेगळ्या समाजघटकांकडूनही सकारात्मक प्रतिसाद मिळाला. त्यामुळे त्यांच्या मुख्यमंत्री कार्यकाळात जनतेकडून मिळालेला पाठिंबा आणि विश्वास विशेष उल्लेखनीय ठरला. आजही एकनाथ शिंदेंचा महाराष्ट्रातील जनतेच्या मनातील मुख्यमंत्री असा उल्लेख होताना दिसतो.
एकीकडे राज्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंमध्ये अंतर्गत कलह सुरू असल्याच्या चर्चा सातत्याने पाहायला मिळतात. अशा परिस्थितीत मागील काही दिवसांपूर्वी एकनाथ शिंदेंनी अचानक दिल्लीची वारी केली. त्यावेळी त्यांना गृहमंधी अमित शाहांची भेट घेतली होती. त्यानंतर खरंतर अनेक मोठ्या घडामोडी घडताना दिसल्या. त्यानंतर आता शिंदेंच्या शिवसेनेचे मंत्री दादा भुसेंनी मोठा दावा केला आहे.

एकनाथ शिंदे पुन्हा मुख्यमंत्री होणार; भुसेंचा दावा
सर्वच पक्षाचे नेते प्रचारात व्यस्त आहेत. अशातच काही दिवसांपूर्वी महायुतीतील वाद चव्हाट्यावर आला होता. त्यानंतर उपमुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख एकनाथ शिंदे हे दिल्लीला गेले होते. त्यांनी अमित शाह यांच्याशी बंद खोलीत चर्चा केली होती. त्यानंतर आता राज्यातील राजकीय समीकरणे बदलण्याची शक्यता आहे. कारण शिवसेनेच्या एका मंत्र्याने एकनाथ शिंदे हे पुन्हा मुख्यमंत्री होणार असल्याचे जाहीर विधान केले आहे.
शिवसेनेचे नेते आणि मंत्री दादा भुसे नंदुरबारमध्ये प्रचारासाठी आले होते. यावेळी बोलताना त्यांनी म्हटले की, जनतेला आजही विचारलं तर जनतेच्या मनातील मुख्यमंत्री कोण? जनता ही सांगेल की एकनाथ शिंदे. महाराष्ट्राने असा मुख्यमंत्री कधी पाहिला नाही ही वस्तुस्थिती आहे. काळजी करू नका परत या महाराष्ट्राचे नेतृत्व एकनाथ शिंदे साहेब करताना आपण सर्वजण पाहणार आहोत, असे विधान दादा भुसेंनी केल्याने चर्चांना उधाण आले आहे.
एकनाथ शिंदेंची महाराष्ट्रात सकारात्मक प्रतिमा
एकनाथ शिंदेंची महाराष्ट्रात सकारात्मक प्रतिमा ही त्यांच्या साध्या, लोकाभिमुख आणि थेट जनतेशी जोडलेल्या कार्यपद्धतीमुळे तयार झाली आहे. ते सतत जनतेच्या प्रश्नांकडे लक्ष देणारे, त्वरित निर्णय घेणारे आणि प्रशासकीय कामकाजात काटेकोरपणा ठेवणारे नेता म्हणून ओळखले जातात. शेतकरी, कामगार, निम्न व मध्यमवर्गीयांसाठी त्यांनी राबवलेल्या योजना आणि समस्यांवर घेतलेली त्वरीत दखल ही त्यांची जमेची बाजू मानली जाते. विकासकामांना गती देणे, पायाभूत सुविधांमध्ये सुधारणा आणि जिल्हा-तहसील पातळीवर वारंवार दौरे करून प्रत्यक्ष परिस्थितीचा आढावा घेणे यामुळे त्यांची “ग्राउंड-लेवल लीडर” म्हणून प्रतिमा अधिक मजबूत झाली आहे.
अगदी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून झोपडीतून आलेला माणूस मुख्यमंत्र्यांना भेटल्याशिवाय जात नव्हता. एकनाथ शिंदे प्रत्येक माणसाला भेटल्याशिवाय झोपायलाही जात नाहीत. उपमुख्यमंत्री अजित पवार साहेब प्रत्येक सभेत सांगतात महाराष्ट्राच्या इतिहासात एवढ्या सह्या करणारा मुख्यमंत्री मी कधी पाहिला नव्हता असं म्हणत एकनाथ शिंदे पुन्हा एकदा मुख्यमंत्री होणार असल्याची भविष्यवाणी दादा भुसे यांनी केली आहे.











