मंत्री पंकजा मुंडेंचे पीए अनंत गर्जेंच्या पत्नीची आत्महत्या; मृत गौरी गर्जेंच्या नातेवाईकांचे खळबळजनक आरोप

Rohit Shinde

मंत्री पंकजा मुंडे यांचे पीए अनंत गर्जे यांच्या पत्नीने आत्महत्या केली. या आत्महत्येबद्दल माहिती मिळताच पंकजा मुंडे यांनी आपले सर्व नियोजित दाैरे रद्द केले आहेत. मुलीच्या आत्महत्येची माहिती मिळताच कुटुंबिय वरळी पोलिस ठाण्यात पोहोचले. मिळालेल्या माहितीनुसार, अगदी काही महिन्यापूर्वीच अनंत गर्जेचे लग्न थाटामाटात पार पडले. कुटुंबियांकडून गंभीर आरोप केली जात असून ही आत्महत्या नाही तर हत्याच असल्याचा दावा केला जात आहे. गेल्या अनेक वर्षांपासून पंकजा मुंडे यांच्यासोबत पीए म्हणून अनंत गर्जे काम करतोय. नुकताच मुलीच्या मामांनी खळबळजनक खुलासा केला. नक्की मुलीने आत्महत्या का केली? हेच त्यांनी सांगत अनंत गर्जेवर गंभीर आरोप केले.

अवघ्या 10 महिन्यांचा संसार आणि शेवट

अनंत गर्जे आणि डॉ गौरी यांचे काही महिन्यांपूर्वीच लग्न झाले होते. नवीन संसाराची स्वप्ने पाहत असतानाच हा दुर्दैवी अंत झाल्याने हळहळ व्यक्त केली जात आहे. 7 फेब्रुवारी रोजी या जोडप्याने लग्नगाठ बांधली होती. मात्र, वरळीमध्ये डॉ गौरी गर्जे यांनी स्वत:ला संपवल्याने मोठी खळबळ उडाली आहे. लग्नाला अवघे काही महिने झाले असतानाच हा प्रकार घडल्याने उलटसुलट चर्चा सुरू झाल्या आहेत. पोलिस या प्रकरणाचा तपास करत असून घटनास्थळी नातेवाईकांनी मोठी गर्दी केली आहे, ज्यामुळे परिसरात तणावाचे वातावरण आहे.

मृत गौरी गर्जेंच्या नातेवाईकांचा गंभीर आरोप

मात्र, या घटनेनंतर मृत तरुणीच्या कुटुंबीयांनी अत्यंत गंभीर आरोप केले आहेत. आपली मुलगी आत्महत्या करूच शकत नाही, तर तिची हत्या करण्यात आल्याचा दावा तिच्या आई-वडिलांनी केला आहे. सध्या मुलीचे कुटुंबीय वरळी पोलीस स्टेशनमध्ये असून त्यांनी सासरच्या मंडळींवर संशय व्यक्त केला आहे. पोलिसांनी या प्रकरणी दोन्ही बाजूंचे म्हणणे ऐकून घेण्यास सुरुवात केली असून पुढील चौकशी सुरू आहे.

अनंत गर्जे आणि आमच्या मुलीमध्ये मागील काही दिवसांपासून वाद सुरू होते. दोघांमध्ये सतत भांडणे करत. तिने याबद्दल सर्व माहिती तिच्या वडिलांना दिली.  अनंत गर्जे याचे बाहेर काही संबंध होते. याबद्दल तिला कळाले. यावरून दोघांमध्ये वाद होता. मुलीने त्याला सोडून दिले आणि परत या गोष्टी करू नको म्हणून सांगतिले. बायकोने सांगितल्यानंतरही तो सतत चॅटिंग करत होता. याबद्दल तिने आपल्या वडिलांकडे काही स्क्रीनशॉर्टही टाकले. ज्यादिवशी मुलीने आत्महत्या केली, त्यादिवशी दोघांमध्ये खूप जास्त भांडणे झाली. तिने वडिलांना फोन देखील केला. या भांडणादरम्यानच तिने स्वत:ला संपवल्याचे अनंत गर्जेने सांगितले. ज्यावेळी मुलगी स्वत:ला संपवत होती, त्यावेळी अनंत गर्जे हा घरात होता, असेही त्याने आम्हाला सांगितले. त्यामुळे एकूणच या प्रकरणाचा गुंता वाढला आहे.

ताज्या बातम्या