महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपासून सक्तवसुली संचलनालय अर्थात ईडीच्या कारवाईला वेग आला असून राज्यभरातील विविध शहरांमध्ये धाडी टाकल्या जात आहेत. दरम्यान आज ईडीने मनसेचे नेते आणि माजी आमदार राजू पाटील यांच्या भावाच्या घरी धाड टाकली आहे अनियमिततेच्या प्रकरणात ही कारवाई करण्यात आली असून, या कारवाईमुळे डोंबिवली परिसरात खळबळ उडाली आहे.
आमदार राजू पाटलांचा बंधू टार्गेटवर
राज्यात मागील काही दिवसांपासून विविध प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या घरांवर आयकर विभागाच्या धाडींचं सत्र सुरू असताना आता राजकीय नेतेही टार्गेटवर असल्याचं पाहायला मिळत आहे. कारण मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे विश्वासू नेते अशी ओळख असणारे माजी आमदार राजू पाटील यांचे धाकटे बंधू विनोद पाटील यांच्या बंगल्यावर आयकर विभागाने धाड टाकली आहे. या धाडीमुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

मंगळवारी रात्री उशिरा आयकर विभागाचे पथक विनोद पाटील यांच्या बंगल्यावर दाखल झाले होते. मात्र रात्री घरात शिरण्यास त्यांना प्रतिबंध करण्यात आला. अखेर आयकर विभागाचे अधिकारी आज सकाळी 6 वाजण्याच्या सुमारास घरात शिरले आणि त्यानंतर घरात तपासणी सुरू आहे. मागील जवळपास 10 तासापासून विनोद पाटील आणि त्यांच्या कुटुंबियांची चौकशी सुरू असल्याचे समजते.
नेमकं प्रकरण आहे तरी काय ?
विनोद पाटील यांच्यावर मुंबईतील राजेंद्र लोढा आणि इतर काही जणांसोबत मिळून आर्थिक घोटाळा केल्याचा आरोप करण्यात आला आहे. याप्रकरणी मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेकडे तक्रार दाखल करण्यात आली होती. तक्रारीच्या आधारे ईडीने प्राथमिक चौकशी सुरू केली होती आणि त्यानंतर आज ही धाड टाकण्यात आली.
या कारवाईदरम्यान इडीने विनोद पाटील यांचा जबाबही नोंदवला आहे. तपास अधिकाऱ्यांकडून आर्थिक व्यवहारांची सविस्तर चौकशी करण्यात येत असून, या व्यवहारांचा स्रोत, संबंधित कंपन्यांचे खाते आणि व्यवहार याची तपशीलवार माहिती मागवण्यात आली आहे. मनसे नेते राजू पाटील हे सध्या पक्षातील महत्त्वाचे पद सांभाळत आहेत. त्यांच्या कुटुंबीयांच्या घरी ईडीची कारवाई झाल्याने राजकीय वर्तुळातही चर्चांना उधाण आले आहे.