मुंबईवर ११ हजारांहून अधिक सीसीटीव्ही कॅमेऱ्याचा वाॅच, २,१४० कोटींच्या खर्चास राज्य सरकारची मंजुरी

मुंबईत दहशतवादी हल्ल्याची पुनरावृत्ती होऊ नये यासाठी मुंबईत सीसीटीव्ही कॅमेऱ्याचे जाळे विणले जात आहेत. यात ११ हजार ३७७ कॅमेरा बसवण्यात येणार असून यापैकी १० हजार ४९१ सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत.

Mumbai CCTV Camera : मुंबईत सीसीटीव्ही कॅमेऱ्याचे जाळे विस्तारले जात आहे. याचाच एक भाग म्हणून दहशतवादी हल्ला, अंतर्गत गुन्हेगारी मोडीत काढण्यासाठी आता मुंबईत एकूण ११ हजार ३७७ सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात येणार असून त्यापैकी १० हजार ४९१ कॅमेरा बसवण्यात आले आहेत. एल अॅन्ड टी कंपनीच्या माध्यमातून सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात येत असून उर्वरित ८६६ सीसीटीव्ही कॅमेरे लवकरच बसवण्यात येणार आहेत. परंतु देखभाल दुरुस्ती, हार्डवेअर बदल करणे यासाठी २,१४० कोटी रुपये खर्चास राज्य सरकारने मंजुरी दिली आहे.

गुन्हेगारांना शोध घेण्यासाठी सीसीटीव्ही कॅमेरे

मुंबईत दहशतवादी हल्ल्याची पुनरावृत्ती होऊ नये यासाठी मुंबईत सीसीटीव्ही कॅमेऱ्याचे जाळे विणले जात आहेत. यात ११ हजार ३७७ कॅमेरा बसवण्यात येणार असून यापैकी १० हजार ४९१ सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत. मुंबईवर वाॅच ठेवणाऱ्या कॅमेराची देखभाल दुरुस्ती गरजेचे आहे. गृह विभागाचे मुख्य सचिव यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन समितीने देखभाल दुरुस्ती, हार्डवेअर बदल करणे या कामासाठी २,१४०.९० कोटी रुपये खर्चास राज्य सरकारने मंजुरी दिली आहे. २६ – ११ ला मुंबईत दहशतवादी हल्ला झाला होता. या हल्ल्यात शेकडो लोकांचा जीव गेला होता, तर शेकडो लोक जखमी झाले होते.

दहशतवादी हल्ल्याचा मुंबईला धोका असून अंतर्गत गुन्हेगारी वाढत आहे. गुन्हेगारांना शोध घेण्यासाठी सीसीटीव्ही कॅमेरे महत्त्वाची भूमिका बजावतात. त्यामुळे देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईत सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याचे आणि कॅमेराची देखभाल दुरुस्ती करणे गरजेचे आहे.

… म्हणून सीसीटीव्ही कॅमेरे गरजेचे!

नवीन तंत्रज्ञानाचा वापर करून गुन्ह्यांचा तपास, वाहतूक व्यवस्थापन व मोटार वाहन कायदा नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर ई-चलानद्वारे कारवाई करण्यासाठी सहाय्यभूत प्रणाली विकसित करण्याकरिता सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात येणारेयय जनरल सव्र्व्हेलन्स क्षमता वृध्दीसाठी कोस्टल रोडसह महत्त्वाच्या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे लावणे. सार्वजनिक ठिकाणी ओळख क्षमता वृध्दीस सहाय्यभूत ठरणारी फेशियल रिकग्निशन कॅमेरे तंत्राचा वापर करणे. आणि गर्दीच्या ठिकाणी व सीसीटीव्ही सर्व्हेलन्सच्या क्षेत्राबाहेरील (Blind Spots) मध्ये आवश्यकतेनुसार Face Recognition क्षमतेसह विकसीत मोबाइल सर्व्हेलन्स पोल्सचा वापर करुन निरीक्षण क्षमता वृध्दी करणे.


About Author

Astha Sutar

Other Latest News