MPSC Exam Timetable : MPSC ची तयारी करणाऱ्यासाठी महत्वाची बातमी समोर येत आहे. शासन सेवेतील विविध पदांवरील भरतीकरीता महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत वर्षभर विविध परीक्षांचे आयोजन करण्यात येते. त्यानुसार सन २०२६ मधील नियोजित विविध स्पर्धा परीक्षांचे अंदाजित वेळापत्रक आयोगाच्या http://mpsc.gov.in व http://mpsconline.gov.in या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आल्याची माहिती महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे अवर सचिव र. प्र. ओतारी यांनी कळविली आहे.
कोणकोणत्या परीक्षा होणार (MPSC Exam Timetable)
प्रस्तावित वेळापत्रकानुसार सन २०२६ मध्ये राज्य सेवा मुख्य परीक्षा-२०२५, महाराष्ट्र वनसेवा मुख्य परीक्षा-२०२५, महाराष्ट्र स्थापत्य अभियांत्रिकी सेवा मुख्य परीक्षा-२०२५, महाराष्ट्र कृषि सेवा मुख्य परीक्षा-२०२५, महाराष्ट्र गट- ब (अराजपत्रित) सेवा संयुक्त मुख्य परीक्षा-२०२५, महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त परीक्षा-२०२५, दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर व न्याय दंडाधिकारी प्रथम वर्ग परीक्षा, महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित परीक्षा-२०२६, महाराष्ट्र गट-ब (अराजपत्रित) सेवा संयुक्त परीक्षा-२०२६ व महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त परीक्षा-२०२६ इत्यादी परीक्षा होणार आहेत, असेही कळविण्यात आले आहे. MPSC Exam Timetable

विद्यार्थ्यांनो तयारीला लागा
महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत परीक्षांचे वेळापत्रक प्रसिद्ध करण्यात आल्यानंतर विद्यार्थ्यांनी सुटकेचा निःश्वास सोडला आहे. तसेच आता परीक्षांची जोरदार तयारी विद्यार्थ्यांकडून करण्यात येईल हे मात्र नक्की.
महाराष्ट्र ही संस्था महाराष्ट्र राज्यातील विविध सरकारी पदांसाठी, जसे की राज्य सेवा, पोलीस सेवा, वन सेवा इत्यादींसाठी भरती प्रक्रिया आणि विभागीय परीक्षा आयोजित करते. या परीक्षांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांसाठी किमान १९ वर्षे वय असणे आवश्यक आहे आणि शैक्षणिक पात्रता म्हणून कोणत्याही शाखेतील पदवी असणे गरजेचे आहे
MPSC म्हणजे महाराष्ट्र लोकसेवा आयोग (Maharashtra Public Service Commission) होय. ही संस्था महाराष्ट्र राज्यातील विविध सरकारी पदांसाठी, जसे की राज्य सेवा, पोलीस सेवा, वन सेवा इत्यादींसाठी भरती प्रक्रिया आणि विभागीय परीक्षा आयोजित करते. MPSC ची परीक्षा अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांसाठी किमान १९ वर्षे वय असणे आवश्यक आहे आणि शैक्षणिक पात्रता म्हणून कोणत्याही शाखेतील पदवी असणे गरजेचे आहे











