मुंबई सायबर फसवणुकीचे केंद्र ? अनेक कॉल सेंटर्सचा पर्दाफाश, नागरिकांची अब्जावधींची फसवणूक!

ऑनलाईन आर्थिक फसवणूक, हॅकिंग, डेटा चोरी, बँकिंग फ्रॉड, सोशल मीडिया अकाउंट्स हॅक होणे अशा घटना मोठ्या प्रमाणावर वाढत आहेत. याबाबत अलीकडेच समोर आलेल्या आकडेवारीमुळे मात्र अनेकांची झोप उडणार आहे. या संपूर्ण परिस्थितीमध्ये अशा अनेक घटना मुंबईतून घडत असल्याचं समोर आलं आहे.

भारतावर सायबर हल्ल्यांचा धोका दिवसेंदिवस वाढतच आहे. सायबर हल्ल्यांचं फक्त प्रमाणच वाढलेलं नाही तर भारत सायबर हल्लेखोरांच्या निशाण्यावर आहे. भारतातील वाढत्या सायबर हल्ल्यांची समस्या दिवसेंदिवस गंभीर होत चालली आहे. तंत्रज्ञानाचा झपाट्याने होत असलेला विकास आणि इंटरनेटचा वाढता वापर यामुळे ऑनलाईन आर्थिक फसवणूक, हॅकिंग, डेटा चोरी, बँकिंग फ्रॉड, सोशल मीडिया अकाउंट्स हॅक होणे अशा घटना मोठ्या प्रमाणावर वाढत आहेत. याबाबत अलीकडेच समोर आलेल्या आकडेवारीमुळे मात्र अनेकांची झोप उडणार आहे. या संपूर्ण परिस्थितीमध्ये अशा अनेक घटना मुंबईतून घडत असल्याचं समोर आलं आहे.

मुंबई आंतरराष्ट्रीय सायबर फसवणुकीचे केंद्र ?

देशाची आर्थिक राजधानी मुंबई पुन्हा एकदा आंतरराष्ट्रीय फसवणूक करणाऱ्यांचे केंद्र बनल्यामुळे चर्चेत आली आहे. २०२५ या वर्षात मुंबई पोलीस, गुन्हे शाखा आणि गुजरात पोलिसांनी शहराच्या विविध भागांत केलेल्या मोठ्या कारवाईत जानेवारी ते डिसेंबर या कालावधीत सहा वेगवेगळ्या  फसवणूक रॅकेटचा पर्दाफाश केला आहे. बनावट कर्ज, शेअर ट्रेडिंग, निर्यात घोटाळे आणि बनावट औषधांच्या नावाखाली अमेरिकन आणि कॅनेडियन नागरिकांकडून अब्जावधी रुपयांची फसवणूक करण्यात आली आहे. या कारवाईत पोलिसांनी ६४ हून अधिक आरोपींना अटक केली आहे.

पोलीस सूत्रांनुसार, हे रॅकेट डार्क वेबवरून अमेरिकन आणि कॅनेडियन नागरिकांचा वैयक्तिक डेटा विकत घेतात. त्यानंतर त्यांना फसविण्यासाठी परिपूर्ण अमेरिकन उच्चारांसह फोन कॉल्स केले जातात. फसवणुकीचे पैसे क्रिप्टोकरन्सी आणि इतर माध्यमांतून हस्तांतरित केले जातात. मुंबईच्या उपनगरीय भागांत अशा बनावट कॉल सेंटर्सची संख्या झपाट्याने वाढत आहे.

सायबर गुन्हेगारांसाठी मुंबई सोयीची ठरत आहे, कारण येथे लक्झरी ऑफिसेस परवडणाऱ्या भाड्यांत उपलब्ध आहेत आणि हाय-स्पीड इंटरनेटची सुविधा सर्वत्र मिळते. अमेरिकन भाषेत अस्खलित इंग्रजी बोलणारे हे फसवणूक करणारे प्रथम पीडितांना फोन करून त्यांची संगणक हॅक झाल्याची भीती दाखवत किंवा स्वस्त औषधांचे आमिष दाखवून फसवत असत. खरंतर मुंबईत अशा प्रकारच्या फसणवूक करणाऱ्या अनेक कॉल सेंटर्सचा पर्दाफाश आजवर झाला आहे.

सायबर हल्ल्यांपासून पैसा, माहिती सुरक्षित ठेवा!

जनरेटिव्ह एआयमुळे सायबर गुन्हेगारांसाठीचे टेक्निकल अडथळे कमी झाले आहेत. यामुळे आता फिशिंग ईमेल, बनावट इनव्हॉइस आणि अगदी डीपफेक स्कॅमही शोधणे प्रचंड कठीण झाले आहे. सायबर हल्ल्यांपासून सुरक्षित राहण्यासाठी काही महत्त्वाच्या गोष्टींचे पालन करणे आवश्यक आहे. सर्वप्रथम मजबूत आणि गुंतागुंतीचे पासवर्ड वापरणे व त्यात वेळोवेळी बदल करणे गरजेचे आहे.

मोबाईल किंवा ई-मेलसाठी द्विस्तरीय प्रमाणीकरण सुरू करावे. संशयास्पद लिंक्स, ई-मेल किंवा अज्ञात फाईल्स उघडणे टाळावे. अँटीव्हायरस आणि फायरवॉल सारखे सुरक्षा सॉफ्टवेअर वापरून उपकरणे सुरक्षित ठेवावीत. सार्वजनिक Wi-Fi वापरताना संवेदनशील माहिती शेअर करू नये. सोशल मीडियावर अनोळखी लोकांना वैयक्तिक माहिती देऊ नये. बँकिंग व्यवहार करताना अधिकृत ॲप किंवा संकेतस्थळाचा वापर करावा. सतर्कता आणि सायबर शिस्त पाळल्यास हॅकिंग, फसवणूक आणि डेटा चोरीपासून सुरक्षितता मिळू शकते.


About Author

Rohit Shinde

Other Latest News