Mumbai To Kolhapur Special Train : महापरिनिर्वाण दिनानिमित्त मुंबई–कोल्हापूर विशेष रेल्वे; पहा वेळापत्रक

कोल्हापूर–मुंबई विशेष एक्स्प्रेस (Train No. 01402) ही गाडी शुक्रवारी 5 डिसेंबर 2025 रोजी सायंकाळी 4.40 वाजता छत्रपती शाहू महाराज टर्मिनस कोल्हापूर येथून सुटेल आणि 6 डिसेंबर रोजी पहाटे 4.00 वाजता मुंबई सीएसएमटी टर्मिनस येथे आगमन होईल

Mumbai To Kolhapur Special Train। महापरिनिर्वाण दिनानिमित्त मुंबई–कोल्हापूर मार्गावरील प्रवाशांची वाढती गर्दी लक्षात घेऊन मध्य रेल्वेने विशेष रेल्वेगाडी सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे. यंदा ६ डिसेंबर रोजी महापरिनिर्वाण दिन आहे, त्यानिमिताने डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना मानणारे हजारो चाहते मुंबईच्या दिशेने कूच करत असतात. अशावेळी बाबासाहेब आंबेडकरांवर प्रेम करणाऱ्या या लोकांना प्रवासाचा त्रास होऊ नये, त्यांना आरामदायी प्रवास करता यावा यासाठी रेल्वे विभागाने हा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे.  रेल्वे विभागाच्या या निर्णयामुळे पश्चिम महाराष्ट्रातील प्रवाशांना मोठा दिलासा मिळाला आहे.

कसे आहे वेळापत्रक? Mumbai To Kolhapur Special Train

कोल्हापूर–मुंबई विशेष एक्स्प्रेस (Train No. 01402) ही गाडी शुक्रवारी 5 डिसेंबर 2025 रोजी सायंकाळी 4.40 वाजता छत्रपती शाहू महाराज टर्मिनस कोल्हापूर येथून सुटेल आणि 6 डिसेंबर रोजी पहाटे 4.00 वाजता मुंबई सीएसएमटी टर्मिनस येथे आगमन होईल. तर मुंबई ते कोल्हापूर-विशेष गाडी (क्रमांक ०४०१) ही गाडी शनिवार, दि. ६ रोजी रात्री १०.३० वाजता मुंबई सीएसएमटी येथून सुटेल व छत्रपती शाहू महाराज टर्मिनस, कोल्हापूर येथे सकाळी १०.०० वाजता पोहोचेल. Mumbai To Kolhapur Special Train

कोणत्या स्थानकावर थांबणार ?

हातकणंगले – सांयंकाळी 5.00 वाजता

जयसिंगपूर – सांयंकाळी 5.20 वाजता
मिरज – सांयंकाळी 5.35 वाजता
सांगली – सांयंकाळी 5.55 वाजता
किर्लोस्करवाडी – सांयंकाळी 6.20 वाजता
कराड – सांयंकाळी 6.50 वाजता
सातारा – रात्री 8.00 वाजता
लोणंद जंक्शन – रात्री 9.00 वाजता
जेजुरी – रात्री 9.30 वाजता
पुणे – रात्री 11.20 वाजता
चिंचवड – रात्री 11.50 वाजता
लोणावळा – मध्यरात्री 12.50 वाजता
कल्याण – मध्यरात्री 2.50 वाजता
ठाणे – पहाटे 3.20 वाजता
दादर – पहाटे 3.42 वाजता
मुंबई सीएसएमटी – पहाटे 4.00 वाजता आगमन


About Author

Asavari Khedekar Burumbadkar

Other Latest News