भारतासारख्या विशाल आणि विविधतेने नटलेल्या देशात महिला सुरक्षिततेचा प्रश्न हा अत्यंत गंभीर आहे. शहरी भागात तसेच ग्रामीण भागात महिलांना छेडछाड, लैंगिक अत्याचार, मानहानी, घरगुती हिंसाचार यांसारख्या धोक्यांचा सामना करावा लागतो. तंत्रज्ञान आणि कायद्याची प्रगती असूनही अनेक ठिकाणी महिलांना सुरक्षिततेची हमी मिळत नाही. अशा परिस्थितीत देशातील सुरक्षित शहरांच्या बाबतीत एक अहवाल समोर आला आहे.
महिलांना वावरण्यासाठी सुरक्षित शहर कोणते असा प्रश्न नेहमीच विचारला जातो. याबाबतचा राष्ट्रीय अहवाल सादर करण्यात आला आहे महिलांसाठी सुरक्षित आणि असुरक्षित अशा शहरांचा NARI चा अहवाल प्रसिद्ध करण्यात आला आहे. यामध्ये 31 राज्यांना महिलांसाठी सुरक्षित गणण्यात आले आहे. तर कोणते शहर सुरक्षित आणि कोणते असुरक्षित याबद्दल जाणून घेऊ…
मुंबई महिलांसाठी सुरक्षित शहर
भारतातील शहरी भागांमध्ये सुमारे 40 टक्के महिला स्वतःला सुरक्षित मानत नाहीत. 18 ते 24 वयोगटातील तरुणी सर्वाधिक धोक्यात असल्याचे चित्र समोर आले आहे. 7 टक्के महिलांनी तर आपल्याला हिंसेचा अनुभव आल्याचे म्हटले आहे. विशेष म्हणजे, दिल्ली, कोलकाता आणि जयपूर सारखी मोठी शहरे महिला सुरक्षेत मागे पडली असून, काही अन्य शहरे सर्वाधिक सुरक्षित ठरली आहेत.
NARI 2025 च्या अहवालनुसार, नागालँडची राजधानी कोहिमा हे शहर देशातील सर्वात सुरक्षित शहर ठरले आहे. याशिवाय विशाखापट्टणम, भुवनेश्वर, आयझोल, गंगटोक, ईटानगर आणि मुंबई यांचा सुरक्षित शहरांच्या यादीत समावेश आहे. तर रांची, श्रीनगर, कोलकाता, दिल्ली, फरीदाबाद, पटना आणि जयपूर ही शहरं असुरक्षित असल्याचे समोर आले आहे. जी महिला सुरक्षेबाबतीत अत्यंत गंभीर बाब आहे. त्यामुळे अपेक्षेपेक्षा मुंबई शहर महिलांसाठी सुरक्षित असल्याचे या अहवालातून समोर आले आहे.
महिला सुरक्षेचा प्रश्न गंभीर
महिला सुरक्षेचा प्रश्न आजच्या समाजात अत्यंत गंभीर बनला आहे. शहरी भागापासून ग्रामीण भागापर्यंत महिलांना छेडछाड, लैंगिक अत्याचार, घरगुती हिंसाचार आणि भेदभावाचा सामना करावा लागतो. कायद्याने कठोर शिक्षा असल्या तरी प्रत्यक्षात त्यांची अंमलबजावणी पुरेशी प्रभावी होत नाही. महिलांसाठी सुरक्षित सार्वजनिक ठिकाणे, कार्यक्षेत्रे आणि प्रवासाची सोय ही वेळेची गरज आहे. समाजातील मानसिकता बदलल्याशिवाय खरी सुरक्षितता मिळणार नाही. महिला सुरक्षितता सुनिश्चित करणे ही केवळ सरकारची जबाबदारी नसून प्रत्येक नागरिकाची कर्तव्य आहे. महिला सुरक्षित राहिल्यासच समाज सशक्त आणि प्रगतिशील होईल. त्यामुळे महिला सुरक्षा ही राष्ट्राच्या प्रगतीची मूलभूत गरज आहे.





