BMC – मुंबईत गेल्या काही दिवसांपूर्वी कबुतरखाने आणि कबुतर यावरुन वातावरण तापले आहे. कबुतरखान्याबाबत मुंबई हायकोर्टात याचिका दाखल करण्यात आली होती. यावर गेल्या आठवड्यात सुनावणी देताना मुंबईत कबुतरखान्यावरील बंदी कोर्टानं कायम ठेवली आहे. पण सकाळी 6 ते 8 या वेळेत पक्षांना दाणे टाकण्यासाठी कोर्टानी परवानगी द्यावी, अशी मागणी मुंबई महापालिकेनं कोर्टात केली होती. यानंतर पालिकेनं लोकांकडन कबुतरांच्या खाद्याबाबत लोकांना हरकती व सूचना मागवल्या आहेत.
लोकांचा विचार करा…
कबुतरांची विष्ठा ही मानवाच्या आरोग्यास धोकादायक असल्यामुळं मानवी वस्तीत कबुतरखाने नको असं विविध संघटना आणि लोकांची इच्छा आहे. कबुतरांना खाद्य देण्याबाबत मुंबई पालिकेने निर्णय घेत असताना नागरिकांच्या सूचना आणि हरकती देखील मागवाव्यात. त्यानंतरच याबाबतचा निर्णय घ्यावा. असं हायकोर्टाने मुंबई महापालिकेला निर्देश दिले होते. यानंतर पालिकेच्या या युक्तिवादानंतर याबाबत तुम्ही एकतर्फी निर्णय घेऊ शकत नाही. शेवटी लोकांचे आरोग्य महत्वाचे आहे… पालिकेनं सार्वजनिक आरोग्याचा विचार करणं गरजेचं आहे. असं हायकोर्टाने म्हटले होते.
हरकती/सूचना कुठे नोंदवता येणार?
दुसरीकडे हरकती व सूचना नोंदविण्यासाठी अर्ज पालिकेच्या वेबसाईटवरील https://portal.mcgm.gov.in/irj/portal/anonymous?guest_user-english या लिंकवर किंवा suggestions@mcgm.gov.in या ईमेल आयडीवर सदर हरकती आणि सूचना मेल करु शकता. तसेच लेखी स्वरुपात देखील हरकती व सूचना देऊ शकता, असं आवाहन पालिका प्रशासनाकडून करण्यात आले आहे. कबुतरखान्यांच्या ठिकाणी कबुतरांना नियंत्रित पद्धतीने खाद्य कसे पुरवावे, यासाठी नागरिकांनी १८ ते २९ ऑगस्ट २०२५ पर्यंत हरकती व सूचना नोंदवाव्यात, असं आवाहन पालिका प्रशासनाने केले आहे.





