Marathi News

Nagpur to Pune Vande Bharat : आजपासून नागपूर-पुणे वंदे भारतला हिरवा कंदील; बुकिंग करताना या ५ गोष्टी लक्षात ठेवा!

Written by:Smita Gangurde
Published:
नागपूर रेल्वे स्थानकावरील प्लॅटफॉर्म क्रमांक 8 वर वंदे भारत ट्रेन शुभारंभ सोहळा पार पडला. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी नागपूर रेल्वे स्थानकावर उपस्थित होते.
Nagpur to Pune Vande Bharat : आजपासून नागपूर-पुणे वंदे भारतला हिरवा कंदील; बुकिंग करताना या ५ गोष्टी लक्षात ठेवा!

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे नागपूर ते पुणे वंदे भारत ट्रेनला हिरवा झेंडा दाखवला. पुणे ते नागपूर हे तब्बल ७५० किलोमीटरचं अंतर वंदे भारत ट्रेनमुळे १२ तासात पूर्ण करता येणार आहे. म्हणजे तुम्ही सकाळी ६.२५ वाजता वंदे भारतने पुण्याहून निघालात तर सायंकाळी ६.२५ पर्यंत नागपुरात पोहोचाल. त्यामुळे नागपुरकरांना मोठा दिलासा मिळाला आहे. नागपूर रेल्वे स्थानकावरील प्लॅटफॉर्म क्रमांक 8 वर वंदे भारत ट्रेन शुभारंभ सोहळा पार पडला. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी नागपूर रेल्वे स्थानकावर उपस्थित होते.

1 14 ऑगस्टपासून नागपूर ते पुणे वंदे भारत ट्रेन सुरू होईल.

2 नागपूर ते पुणे वंदे भारत ट्रेनचा वेळा…l (Nagpur to Pune Vande Bharat train timings)

नागपूरच्या अजनी रेल्वे स्थानकावरून दररोज सकाळी 9.50 मिनिटांनी वंदे भारत सुटेल आणि रात्री 9.50 ला पुणे येथे पोहोचेल. याशिवाय पुण्यातून सकाळी 6.25 ला वंदे भारत सुटणार असून संध्याकाळी 6.25 ला नागपुरात पोहचणार आहे.

3 नागपूर ते पुणे वंदे भारत ट्रेनचे थांबे कोणते? l (stops of Nagpur to Pune Vande Bharat)

– वर्धा, बडनेरा, अकोला, भुसावळ, जळगाव, मनमाड, कोपरगाव, अहिल्यानगर आणि दौंड स्थानकावर वंदे भारतचे थांबे आहेत.

4 आठवड्याचे किती दिवस धावणार? l (how many days of the week will it run)

लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या विदर्भाची पंढरी अर्थात श्री संत गजानन महाराज नगर शेगावमध्येही या गाडीचा थांबा देण्यात आला आहे. नागपूरहून सोमवार वगळता आठवड्यातील सहा दिवस आणि पुणे येथून मंगळवार वगळता सहा दिवस ही ट्रेन धावणार आहे. सध्या नागपूर ते पुणे अंतर कापण्यासाठी दुरांतोला 12 तास 55 मिनिटं लागतात. नागपुरातून सध्या सिकंदराबाद, बिलासपुर आणि इंदूर अशा तीन वंदे भारत सुरू असून पुणे हे चौथी वंदे भारत ठरणार आहे.

5 तिकीट दर किती? l (ticket price of Nagpur to Pune Vande Bharat )

– नागपूर (अजनी) ते पुणे चेअर कार – 1595 रुपये
– नागपूर (अजनी) ते पुणे एक्जेक्युटिव्ह कार – 3185 रुपये
– प्रवाशांच्या मागणीनुसार ही ट्रेन स्लीपर असावी अशी अपेक्षा होती मात्र ही गाडी चेअर कार असणार आहे

Follow Us :GoogleNews