भारतीय रेल्वे ही देशाची जीवनरेखा मानली जाते. ती केवळ प्रवासाचे साधन नसून देशातील विविध भागांना जोडणारा महत्त्वाचा दुवा आहे. ग्रामीण भागांपासून महानगरांपर्यंत रेल्वेमुळे लोक सहज प्रवास करू शकतात. दररोज कोट्यवधी प्रवासी रेल्वेच्या सेवांचा लाभ घेतात. मुंबई-बंगळुरू, बंगळुरू-मुंबई या मार्गावर प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या मोठी आहे. ही बाब लक्षात घेऊनच आता नवी सुपरफास्ट एक्स्प्रेस या मार्गावर सुरू केली जाणार असल्याची माहिती समोर येत आहे.
मुंबई-बंगळुरू नवी सुपरफास्ट एक्स्प्रेस धावणार!
देशातील दोन महत्त्वाची शहरं मुंबई आणि बंगळुरू यांच्यातील प्रवास अनेकदा लांब आणि थकवणारा असतो. विमान प्रवास महागडा होत असताना रेल्वेने प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी आता एक मोठी आनंदाची बातमी आहे. भारतीय रेल्वेने बंगळुरू-मुंबईदरम्यान दुसरी सुपरफास्ट ट्रेन सुरू करण्यास रेल्वे मंत्रालयाने मंजुरी दिली आहे. उद्यान एक्सप्रेस सुरू झाल्यानंतर जवळपास 30 वर्षांनी ही नवीन थेट ट्रेन मंजूर झाली आहे. या नव्या ट्रेनमुळे आता दोन्ही व्यापार केंद्रांमधील कनेक्टिव्हिटी आणखी सुधारणार आहे.

रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी आहे. भारतीय रेल्वेने बंगळुरू-मुंबई दरम्यान दुसरी सुपरफास्ट ट्रेन सुरू करण्यास मंजुरी दिली आहे. उद्यान एक्सप्रेस सुरू झाल्यानंतर आता जवळजवळ ३० वर्षांनी आता या दोन महत्त्वाच्या शहरांदरम्यान ही नवीन ट्रेन धावणार आहे. केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी यांनी एक्सवर एक पोस्ट शेअर करून या संदर्भातील माहिती दिली आहे. तसेच त्यांनी नवीन ट्रेनला मंजुरी दिल्याबद्दल त्यांनी रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांचे आभार देखील मानले आहेत.
अनेक वर्षांची प्रलंबित मागणी अखेरीस मान्य
सध्या बंगळुरू आणि मुंबईला थेट जोडणारी उद्यान एक्सप्रेस ही एकमेव ट्रेन आहे. ही ट्रेन 1,153 किलोमीटरचे अंतर कापण्यासाठी सुमारे 23 तास 35 मिनिटांचा वेळ घेते आणि 31 ठिकाणी थांबते. ही ट्रेन सोलापूर मार्गावरून धावते. बंगळुरू-मुंबईला थेट जोडणाऱ्या उद्यान एक्सप्रेसप्रमाणे आणखी एक ट्रेन सुरू करण्याची मागणी होत होती गेल्या 30 वर्षांपासून होत होती. अखेर प्रवाशांच्या या मागणीला रेल्वे मंत्रालयाने हिरवा कंदील दाखलवा आहे. लवकरच या मार्गावर नवी एक्सप्रेस ट्रेन धावणार आहे.
मार्गावरील स्थानके आणि वेळापत्रक कसे ?
नवी सुपरफास्ट ट्रेन मध्य कर्नाटकमधील हुबळी-धारवाड मार्गे धावणार असून या ट्रेनमुळे प्रवासाचा वेळ लक्षणीयरीत्या कमी होण्याची अपेक्षा आहे. अंदाजे हा वेळ 18 तासांपर्यंत कमी होऊ शकतो. हुबळीमार्गे धावणारी ही नवीन सुपरफास्ट ट्रेन अधिक वेगवान आणि कार्यक्षम असेल. सुमारे 600 किलोमीटरचा प्रवास मध्य कर्नाटकमधून होईल. ट्रेन बंगळुरूच्या सर एम. विश्वेश्वरैया टर्मिनल येथून आपला प्रवास सुरू करेल आणि मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे समाप्त होईल. या प्रवासादरम्यान ही ट्रेन कर्नाटकातील तुमकुरू, दावणगेरे, हावेरी, हुबळी-धारवाड आणि बेळगाव यांसारख्या महत्त्वाच्या स्थानकांवर थांबेल. यानंतर या ट्रेनचा प्रवास महाराष्ट्रातून होईल, परंतु महाराष्ट्रात कोणत्या स्थानकांवर ही ट्रेनचे थांबेल यांबाबातची माहिती मिळू शकलेली नाही. अंतिम आणि अधिकृत वेळापत्रकाची प्रतीक्षा कायम आहे.