Market Price: सोयाबीन आणि कांद्याच्या दराबाबत मोठी अपडेट; महाराष्ट्रात कुठे अन् किती दर ?

Rohit Shinde

महाराष्ट्रातील बहुतांश बाजार समित्यांमध्ये सध्या कांदा आणि सोयाबीनच्या दरामध्ये कमालीची अस्थिरता पाहायला मिळत आहे. शनिवार, 06 डिसेंबर 2025 रोजी राज्यातील बाजार समित्यांमध्ये दराची एकूण काय स्थिती राहिली, त्याबाबत सविस्तर जाणून घेऊ…

जालन्यात सोयाबीनला सर्वाधिक भाव

राज्याच्या मार्केटमध्ये 28 हजार 611 क्विंटल सोयाबीनची एकूण आवक झाली. जालना मार्केटमध्ये 5 हजार 405 क्विंटल आवक राहिली. त्यास प्रतीनुसार 4000 ते 4850 रुपये प्रतिक्विंटल बाजारभाव मिळाला. जालना मार्केटमध्ये आवक झालेल्या सोयाबीनला 4850 रुपये इतका सर्वाधिक बाजारभाव मिळाला. शुक्रवारच्या तुलनेत सोयाबीनची आवक वाढली असून भावात घट झाली आहे.

कांद्याला किती मिळाला आज भाव? 

राज्याच्या मार्केटमध्ये 50 हजार 564 क्विंटल कांद्याची एकूण आवक झाली. यापैकी 24 हजार 696 क्विंटल सर्वाधिक आवक नाशिक बाजारात झाली. त्यास प्रतीनुसार 342 ते 1560 रुपयांपर्यंत बाजारभाव मिळाला. तसेच नाशिक मार्केटमध्ये आवक झालेल्या 1575 क्विंटल पोळ कांद्यास प्रतीनुसार 400 ते 4051 रुपये सर्वाधिक बाजारभाव मिळाला. शुक्रवारच्या तुलनेत कांद्याची आवक कमी झाली असून भावात वाढ झाली आहे.
कांदा उत्पादक शेतकऱ्यांची कोंडी

राज्यातील बाजार समित्यांमध्ये कांद्याची आवक चांगलीच वाढताना दिसत आहे. याचा फटका आता कांदा उत्पादक शेतकऱ्यांना बसणार आहे. कारण, दरांमध्ये घसरण होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. खरंतर एकीकडे राज्यामध्ये कांद्याच्या मागणीत वाढ जरी झाली असला तरी दुसरीकडे आवक देखील तेवढीच वाढत आहे. परिणाम कांद्याच्या दरामध्ये कोणतीही लक्षवेधी सुधारणा होताना दिसत नाही. त्यामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या अडचणी वाढताना दिसत आहेत.

ताज्या बातम्या