October Heat: मुंबईसह कोकणात ऑक्टोबर हीटचा तडाखा; उष्णतेमुळे नागरिक हैराण!

ऑक्टोबर हीटचा प्रभाव सध्या राज्यातील बहुतांश भागात जाणवतोय, मुंबईसह कोकणात ऑक्टोबर हीटमुळे चांगलाच तडाखा बसताना दिसत आहे. नागरिक हैराण झाले आहेत.

‘ऑक्टोबर हीट’ म्हणजे ऑक्टोबर महिन्यात जाणवणारी असामान्य उष्णता. साधारणतः पावसाळ्यानंतर, म्हणजे सप्टेंबरच्या अखेरीस किंवा ऑक्टोबरच्या सुरुवातीला, हवा कोरडी होते आणि वातावरणात आर्द्रतेचं प्रमाण कमी होतं. या काळात तापमान अचानक वाढतं, ज्यामुळे दिवसाचे वातावरण उकाड्याचे व दमट होते यालाच “ऑक्टोबर हीट” म्हणतात. सध्यस्थितील राज्याच्या बऱ्याच भागात ऑक्टोबर हीटचा प्रभाव जाणवतोय, त्यामध्ये मुंबईसह कोकणात परिस्थिती अधिक गंभीर स्थितीला आहे.

मुंबईसह कोकणात ऑक्टोबर हीटचा प्रभाव

गेल्या काही दिवसांपासून राज्यात हवामानात मोठ्या प्रमाणात बदल दिसून येत आहेत. सप्टेंबरच्या अखेरपर्यंत झालेल्या मुसळधार पावसानंतर आता ऑक्टोबर महिन्यात वातावरण पूर्णपणे बदलले आहे. पावसाचा जोर ओसरल्याने आणि सूर्यकिरणांचा तडाखा वाढल्याने कोकण किनारपट्टीवर उकाड्याने नागरिक त्रस्त झाले आहेत. सध्या ‘ऑक्टोबर हीट’चा काळ सुरू असून, दुपारच्या सुमारास तापमान झपाट्याने वाढताना दिसत आहे.

मुंबईत आज आकाश स्वच्छ आणि ऊन प्रखर आहे. सकाळपासूनच सूर्य तळपत असून दुपारपर्यंत उकाडा अधिक जाणवणार आहे.  दमट वातावरणामुळे घामाघूम परिस्थिती निर्माण झाली आहे. पावसाने विश्रांती घेतल्यामुळे रस्ते कोरडे झाले आहेत आणि नागरिकांना आज उष्णतेचा त्रास जाणवेल.

पालघर जिल्ह्यात आजही कोरडे हवामान राहील. सकाळपासूनच उष्णता जाणवत असून सायंकाळपर्यंत उकाडा वाढेल. रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यांमध्ये आज आंशिक ढगाळ वातावरण राहील, पण पाऊस होणार नाही. गेल्या आठवड्यापासून पाऊस थांबल्याने वातावरण कोरडे झाले आहे. तर सिंधुदुर्ग जिल्ह्यात आज हलक्या ते मध्यम पावसाच्या सरी पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे एकीकडे ऑक्टोबर हीटचा प्रभाव आणि एकीकडे ढगांची गर्दी अशी स्थिती सध्या निर्माण झाली आहे.

ऑक्टोबर हीटमध्ये काळजी कशी घ्यावी?

शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी होऊन थकवा, डोकेदुखी, चक्कर येणे, त्वचेचा कोरडेपणा, आणि डिहायड्रेशन यांसारखे त्रास उद्भवू शकतात. त्यामुळे या काळात काही सोप्या काळजीच्या उपायांनी आरोग्य चांगले राखता येते. सर्वप्रथम भरपूर पाणी पिणे अत्यंत आवश्यक आहे. दिवसातून किमान ८ ते १० ग्लास पाणी प्यावे, तसेच लिंबूपाणी, ताक, नारळपाणी यांसारख्या द्रवपदार्थांचा वापर करावा. उघड्यावर जाताना डोक्यावर टोपी, डोळ्यांवर सनग्लास आणि हलके सूती कपडे घालावेत. दुपारी सूर्यप्रकाश तीव्र असताना बाहेर जाणे टाळावे आणि घरात शक्यतो थंड वातावरण ठेवावे.

झोपताना पंखा किंवा कूलरचा योग्य वापर करावा पण थेट वारा लागू देऊ नये. आहारात फळे, भाज्या आणि हलके अन्न घेणे चांगले. तळलेले आणि जड पदार्थ टाळावेत. मुलं, ज्येष्ठ नागरिक आणि हृदयविकार, मधुमेह असलेल्या व्यक्तींनी विशेष काळजी घ्यावी. थकवा जाणवल्यास त्वरित विश्रांती घ्यावी. या छोट्या उपायांनी ऑक्टोबर हीटचा त्रास कमी करून शरीर निरोगी आणि ताजेतवाने ठेवता येते.


About Author

Rohit Shinde

Other Latest News