Uday Samant – गेल्या कित्येक वर्षापासूनची मागणी केंद्र सरकारने पूर्ण केली. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळवून देण्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा मोलाचा वाटा असून, त्यांच्या पुढाकारामुळेच हा ऐतिहासिक निर्णय प्रत्यक्षात आला. अभिजात मराठी भाषा सन्मान दिन २०२५ निमित्त आयोजित अभिजात मराठी भाषा सप्ताहाचे उद्घाटन मुंबईतील रवींद्र नाट्य मंदिर येथे मुख्यमंत्री मा. देवेंद्रजी फडणवीस यांच्या हस्ते पार पडले. या सप्ताहाची सांगता शिवसेना पक्षप्रमुख आणि राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांच्या उपस्थितीत होणार आहे. असं उद्योग व मराठी भाषा मंत्री, उदय सामंत यांनी सांगितले.
राज्यात मराठी सप्ताहाचे विविध कार्यक्रम
या आठवड्यात अमरावती, छत्रपती संभाजीनगर, तसेच इतर जिल्ह्यांमध्ये मराठी भाषेचा जागर करणारे कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत असे सामंत यांनी स्पष्ट केले. तसेच अभिजात मराठी भाषा सन्मान दिन २०२५ निमित्त संपूर्ण राज्यात विविध कार्यक्रम करणार आहे. यातून मराठी भाषेची जागृती करण्यात येणार आहे. असं मराठी भाषा मंत्री, उदय सामंत यांनी सांगितले. तसेच काही गटांच्या दसरा मेळाव्यात अपशब्द व अपमानास्पद वागणूक पाहायला मिळाली. मात्र शिवसेना पक्षाच्या मेळाव्यात शिंदे साहेबांनी अत्यंत संयमित आणि सभ्य भाषण करत चांगल्या राजकारणाचं उदाहरण निर्माण केलं.

धर्मवीर आनंद दिघे नागरी सहाय्यता केंद्रांची विस्तार योजना
शिवसेना आता धर्मवीर आनंद दिघे नागरी सहाय्यता केंद्रांच्या माध्यमातून शासनाच्या योजना व सेवा ग्रामीण भागांपर्यंत पोचवण्यासाठी कार्यरत आहे. यामुळे नागरिकांना तालुक्याच्या ठिकाणी धावपळ न करता स्थानिक स्तरावरच मदत मिळेल असा उल्लेख केला. ‘शासन आपल्या दारी’ योजनेचा मोठा लाभ नागरिकांना
मुख्यमंत्री असताना एकनाथ शिंदे साहेबांनी सुरू केलेल्या ‘शासन आपल्या दारी’ या उपक्रमाने राज्यभरातील सुमारे ५.५ कोटी नागरिकांना थेट लाभ मिळवून दिला. तसेच शिवसेनेच्या दसरा मेळाव्याची सुरुवात पूरग्रस्त भागांना मदत पाठवून झाली. विशेष म्हणजे, प्रत्येक जिल्ह्यातील शिवसैनिकांनी स्वखर्चाने शिवसेना रिलीफ फंडात योगदान दिले आहे. असं सामंत म्हणाले.
शिंदे साहेबांवरील टीका सहन केली जाणार नाही
नवी मुंबईत झालेल्या एका कार्यक्रमात मी स्पष्टपणे सांगितलं की, शिंदे साहेबांवर उठसुठ टीका करणं खपवून घेतलं जाणार नाही. गणेश नाईक साहेबांनी जर काही शंका/कुशंका असल्यास, त्यांनी थेट शिंदे साहेबांची भेट घ्यावी असा सल्ला सामंत यांनी गणेश नाईक यांना दिला. नाईक साहेबांनी शिंदे साहेबांवर अनावश्यक टीका करण्याऐवजी, आजच्या खरी विरोधक – उबाठावर (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) टीका करावी. ते उबाठाजवळ गेले आहेत की काय, अशी शंका सध्या निर्माण होत आहे असे सामंत म्हणाले.
रिकाम्या खुर्च्यांचं भाडं कोण भरणार?
विरोधी गटाच्या दसरा मेळाव्यातील रिकाम्या खुर्च्यांच्या भाड्यावरून त्यांच्यातच वाद सुरू आहेत. या प्रकाराची सविस्तर माहिती माध्यमांनी शोधून काढावी, अशी त्यांनी प्रसार माध्यमांना विनंतीही केली. तसेच राजन तेली यांचा पक्षप्रवेश व त्याचा परिणाम होणार नाही. राजन तेली यांच्या प्रवेशामुळे दीपक केसरकर साहेबांची ताकद निश्चितच वाढणार आहे. मात्र यामार्फत कोणतीही समांतर यंत्रणा तयार केली जाणार नाही असे सुतोवाच देखील मंत्री सामंत यांनी केले.











