महाराष्ट्रातील कांदा, सोयाबीन मार्केटमध्ये मोठ्या घडामोडी दिसत आहेत. रविवारी राज्यातील महत्त्वाच्या बाजारपेठांत या पिकांच्या दरात मोठे चढ-उतार दिसले. तरी कांदा आणि सोयाबीन दरांतही फारशी तेजी दिसली नाही. महाराष्ट्रातील बहुतांश बाजार समित्यांमध्ये सध्या कांदा आणि सोयाबीनच्या दरामध्ये कमालीची अस्थिरता पाहायला मिळत आहे. रविवार, 30 नोव्हेंबर 2025 रोजी राज्यातील बाजार समित्यांमध्ये दराची एकूण काय स्थिती राहिली, त्याबाबत सविस्तर जाणून घेऊ…
कांद्याची उच्चांकी आवक; दर जैसे थे !
राज्याच्या मार्केटमध्ये 45 हजार 773 क्विंटल कांद्याची एकूण आवक झाली. यापैकी 15130 क्विंटल सर्वाधिक आवक पुणे बाजारात झाली. त्यास प्रतीनुसार 533 ते 1533 रुपयांपर्यंत बाजारभाव मिळाला. तसेच सातारा मार्केटमध्ये आवक झालेल्या 206 क्विंटल कांद्यास सर्वसाधारण 1500 रुपये सर्वाधिक बाजारभाव मिळाला. त्यामुळे एकुणच महाराष्ट्रातील बाजार समित्यांमध्ये कांद्याच्या दरामध्ये कोणतीही लक्षवेधी सुधारणा होताना दिसत नाही. त्यामुळे शेतकरी वर्गात सध्या कमालीची नाराजी पाहायला मिळत आहे.
सोयाबीन आवक घटली, दर स्थिरावले !
राज्याच्या मार्केटमध्ये 924 क्विंटल सोयाबीनची एकूण आवक झाली. यापैकी बुलढाणा मार्केटमध्ये 600 क्विंटल आवक राहिली. त्यास प्रतीनुसार 4200 ते 4400 रुपये प्रतिक्विंटल बाजारभाव मिळाला. तसेच लातूर मार्केटमध्ये आवक झालेल्या 111 क्विंटल पिवळ्या सोयाबीनला प्रतीनुसार 4330 ते 4660 रुपये प्रमाणे सर्वाधिक बाजारभाव मिळाला. त्यामुळे एकुणच राज्यातील बाजार समित्यांमध्ये सध्या तरी सोयाबीनच्या दरामध्ये काहीसा बदल पाहायला मिळत आहे.
दर कमी, शेतकऱ्यांमधून नाराजीचा सूर
अलीकडे कांदा आणि सोयाबीनच्या बाजारभावात मोठी घसरण झाल्याने राज्यातील शेतकऱ्यांची गंभीर कोंडी निर्माण झाली आहे. उत्पादन खर्च वाढत असताना मिळणारा दर अत्यंत कमी असल्याने शेतकऱ्यांना तोटा सहन करावा लागत आहे. बाजार समित्यांमध्ये आवक वाढली असली तरी व्यापाऱ्यांकडून योग्य किंमत मिळत नसल्याची तक्रार शेतकरी व्यक्त करत आहेत.












