MP Breaking News
Sat, Dec 20, 2025

HSRP नंबर प्लेटसाठी उरले अवघे 10 दिवस; तात्काळ एचएसआरपी नंबर प्लेट बनवून घ्या, अन्यथा कारवाई अटळ

Written by:Rohit Shinde
Published:
महाराष्ट्रात वाहनांवर हाय सिक्युरिटी नोंदणी प्लेट (HSRP) लावणे अनिवार्य केले आहे. ही प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी 15 ऑगस्ट ही शेवटची मुदत देण्यात आली असून, यानंतर मुदतवाढ दिली जाणार नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.
HSRP नंबर प्लेटसाठी उरले अवघे 10 दिवस; तात्काळ एचएसआरपी नंबर प्लेट बनवून घ्या, अन्यथा कारवाई अटळ

महाराष्ट्र परिवहन विभागाने 1 एप्रिल 2019 पूर्वी नोंदणी झालेल्या सर्व वाहनांवर हाय सिक्युरिटी नोंदणी प्लेट (HSRP) लावणे अनिवार्य केले आहे. ही प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी 15 ऑगस्ट ही शेवटची मुदत देण्यात आली असून, यानंतर मुदतवाढ दिली जाणार नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. HSRP प्लेट लावण्याच्या प्रक्रियेला विविध अडथळ्यांमुळे अपेक्षित वेग मिळालेला नाही. महाराष्ट्रात एकूण सुमारे 2.1 कोटी वाहनांपैकी केवळ 23 लाख वाहनांवरच आतापर्यंत या प्लेट्स बसवण्यात आल्या आहेत. त्यामुळे उरलेल्या इतक्या कमी काळात ही प्रक्रिया नक्की पूर्ण होणार का असा सवाल या निमित्ताने निर्माण झाला आहे. अशी नंबर प्लेट न बनविल्यास वाहनधारकांना कायदेशीर कारवाईला समोरे जावे लागणार आहे.

सातत्याने मुदतवाढ; प्रतिसाद कमी

मार्च 2025, एप्रिल 2025 आणि जून 2025 या कालावधीत तीन वेळा मुदतवाढ देण्यात आलेली होती. मात्र आता परिवहन विभागाने अधिक कठोर पवित्रा घेतला आहे. 15 ऑगस्टनंतर जर वाहनावर HSRP प्लेट नसेल, तर भरारी पथक थेट कारवाई करत 1,000 ते 10,000 रुपयांपर्यंत दंड ठोठावू शकते. HSRP प्लेट लावण्याच्या प्रक्रियेला विविध अडथळ्यांमुळे अपेक्षित वेग मिळालेला नाही. महाराष्ट्रात एकूण सुमारे 2.1 कोटी वाहनांपैकी केवळ 23 लाख वाहनांवरच आतापर्यंत या प्लेट्स बसवण्यात आल्या आहेत. ऑनलाइन नोंदणीतील तांत्रिक समस्यांमुळे, फिटमेंट केंद्रांवरील वाढलेली गर्दी, प्लेट्सची कमी उपलब्धता आणि ग्रामीण भागात जनजागृतीचा अभाव यामुळे मुदतवाढीचा निर्णय घेण्यात आला. उदाहरणार्थ, नागपूरमध्ये बुकिंग स्लॉट्स आधीच सप्टेंबर 2025 पर्यंत भरले आहेत, त्यामुळे अनेक वाहनचालक अडचणीत सापडले आहेत.

HSRP नंबर प्लेटचे महत्व

HSRP (High Security Registration Plate) ही वाहनांच्या सुरक्षिततेसाठी आवश्यक असलेली नंबर प्लेट आहे, जी भारत सरकारने अनिवार्य केली आहे. महाराष्ट्रातही ही प्रणाली सक्तीने लागू करण्यात आली आहे. HSRP प्लेटमध्ये क्रोमियम-आधारित होलोग्राम, एक कोड, आणि स्थायिक क्लॅम्प्स असतात, जे नकली नंबर प्लेट्सपासून संरक्षण देतात. यामुळे वाहन चोरी रोखण्यास मदत होते आणि ट्रॅफिक व्यवस्थापन सुलभ होते. पोलिस आणि परिवहन विभागासाठी वाहन ओळखणे सोपे जाते. RTO कार्यालयातून अधिकृत वितरकांकडूनच ही प्लेट मिळते. HSRP लागू केल्याने महाराष्ट्रातील वाहनांचे नोंदणी आणि ट्रॅकिंग अधिक पारदर्शक व सुरक्षित झाले आहे. त्यामुळे ती अत्यंत महत्त्वाची ठरते.