अधिवेशनाच्या पुर्वसंध्येला चहापानावर विरोधकांचा बहिष्कार; वेगळ्या विदर्भाचा मुद्दा पुन्हा तापण्याची शक्यता

खरंतर प्रत्येक हिवाळी अधिवेशनाच्या दरम्यानच्या काळात वेगळ्या विदर्भाचा मुद्दा चर्चेत येत असतो. यंदा देखील तशीच परिस्थिती आहे. शिवाय, विरोधकांनी सत्ताधाऱ्यांच्या चहापनावर बहिष्कार टाकला.

उद्यापासून सुरू होत असलेल्या नागपूर हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर सरकारने प्रथेनुसार विरोधकांना चहापानाचे आमंत्रण दिले होते. मात्र, या आमंत्रणाला विरोधकांनी बहिष्कार घालत सरकारविरोधात नाराजी व्यक्त केली. याबाबत नागपूरमध्ये विरोधकांनी संयुक्त पत्रकार परिषद घेत महायुती सरकारवर जोरदार टीका केली. काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी महायुती सरकारच्या अपयशाची कुंडलीच सादर केली आहे. शिवाय या अधिवेशनाच्या काळात वेगळ्या विदर्भाचा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.

विजय वडेट्टीवारांची आक्रमक भूमिका

विजय वडेट्टीवार म्हणाले की, सत्ताधारी पक्षाकडून वैयक्तिक चहापानाचं निमंत्रण काल आम्हाला मिळाले. गेल्या अनेक वर्षांची परंपरा आणि प्रथेने विरोधी पक्षाला निमंत्रण दिले जाते. दुर्दैवाने सत्ताधाऱ्यांची मनसुबा आहे की, दोन्ही सभागृहांचे विरोधी पक्ष नेते नाहीत. दोन्ही सभागृहांचे विरोधी पक्ष नेते पद रिक्त आहे. हे दोन्ही पद संविधानिक पद आहे. दोन्ही संविधानिक पदे रिक्त ठेवून संविधानावर अविश्वास दाखवणाऱ्या सत्ताधाऱ्यांच्या चहापानाला जाण्याचे आम्ही टाळले आहे. त्यामुळे आम्ही चहापानावर बहिष्कार टाकत आहोत, अशी माहिती त्यांनी दिली.

वेगळ्या विदर्भाचा मुद्दा पुन्हा तापणार

दरम्यान यंदाच्या हिवाळी अधिवेशनात वेगळ्या विदर्भाचा मुद्दा चांगलाच पेटण्याची चिन्हं दिसत आहेत. काँग्रेसचे वरिष्ठ नेते विजय वडेट्टीवार यांनी वेगळा विदर्भ झालाच पाहिले, अशी ठाम मागणी केली आहे. त्यांनी महाराष्ट्रात एका विशिष्ट समाजाचं प्राबल्य वाढल्याचा आरोप देखील केला. या पार्श्वभूमीवर विरोधकांच्या बैठकीत वेगळ्या विदर्भाच्या प्रश्नावर सविस्तर चर्चा होणार असल्याचं वडेट्टीवार यांनी स्पष्ट केलं. सत्ताधारी पक्षाकडून आम्हाला चहापानाचं निमंत्रण मिळालं असून दोन्ही सभागृहात विरोधी पक्षनेते नाहीत.

संवैधानिक पदं रिक्त ठेऊन संविधानावर अविश्वास दाखवणाऱ्या सरकारच्या चहापानाचा आम्ही जाणार नाही. रोज शेतकरी आत्महत्या करत आहेत, शेतकरी कर्जमाफीचा पत्ता नाही. त्याचप्रमाणे येथून मागे देखील विरोधकांची संख्या कमी असून देखील काँग्रेसने कधी संवैधानिक पद रिक्त ठेवले नाही, यांना विरोधकांची भीती वाटते की काय? असा सवाल त्यांनी यावेळी उपस्थित केला आहे.


About Author

Rohit Shinde

Other Latest News