MP Breaking News
Fri, Dec 19, 2025

उस्मानाबाद रेल्वे स्टेशनचे नाव बदलले, भारतीय रेल्वेने आजपासून केला बदल

Published:
उस्मानाबाद' हे नाव २०व्या शतकातील हैदराबाद रियासतीच्या शासकावरून ठेवण्यात आले होते, तर 'धाराशिव' हे या भागात असलेल्या ८व्या शतकातील प्राचीन गुहा संकुलावरून घेतलेले नाव आहे.
उस्मानाबाद रेल्वे स्टेशनचे नाव बदलले, भारतीय रेल्वेने आजपासून केला बदल

Osmanabad Railway Station Name Change : राज्यातील उस्मानाबाद रेल्वे स्थानकाला आता धाराशिव रेल्वे स्थानक या नावाने ओळखले जाईल. राज्य सरकारने शहराचे नाव बदलून धाराशिव करण्याचा निर्णय घेतल्यानंतर भारतीय रेल्वेने हा बदल अंमलात आणला आहे.
रेल्वे प्रशासनाने सांगितले की, स्थानकाच्या नव्या नाव ‘धाराशिव’ आणि नव्या कोड DRSV ला भारतीय रेल्वे कॉन्फरन्स असोसिएशन (IRCA) ची मान्यता मिळाली आहे. यापूर्वी हे स्थानक UMD कोड अंतर्गत उस्मानाबाद या नावाने ओळखले जात होते.

अधिकृत नोंदींमध्ये नावात बदल बदललेल्या नव्या नावाचा वापर आता सर्व अधिकृत रेल्वे रेकॉर्ड्स, स्थानकांच्या पाट्यांवर, घोषणांमध्ये, आणि प्रवाशांना दिल्या जाणाऱ्या माहितीत केला जाणार आहे.

३१ मेच्या रात्री आरक्षण प्रणाली काही वेळ ठप्प राहणार

नाव बदलाच्या प्रक्रियेअंतर्गत, मुंबई पीआरएस (प्रवासी आरक्षण प्रणाली) ३१ मेच्या रात्री ११:४५ वाजता ते १ जून रोजी सकाळी १:३० वाजेपर्यंत तात्पुरती बंद राहणार आहे. या काळात नावाचा तांत्रिक अद्ययावत करून तो प्रणालीमध्ये लागू करण्यात येणार आहे.
रेल्वे प्रशासनाने प्रवाशांना विनंती केली आहे की, या नाव बदलाची नोंद घ्यावी आणि याच काळात आरक्षणाची कामे टाळावीत किंवा पूर्वीच पूर्ण करून घ्यावीत जेणेकरून अडचण होणार नाही.

‘धाराशिव’ या नावामागचं ऐतिहासिक महत्त्व

एका रिपोर्टनुसार, ‘उस्मानाबाद’ हे नाव २०व्या शतकातील हैदराबाद रियासतीच्या शासकावरून ठेवण्यात आले होते, तर ‘धाराशिव’ हे या भागात असलेल्या ८व्या शतकातील प्राचीन गुहा संकुलावरून घेतलेले नाव आहे.

रेल्वे प्रकल्पांना मंजुरी

याच आठवड्यात केंद्र सरकारने महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशातील ३३९९ कोटी रुपयांच्या दोन महत्त्वाच्या मल्टीट्रॅकिंग रेल्वे प्रकल्पांना मंजुरी दिली आहे. हा निर्णय २८ मे रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या आर्थिक व्यवहार समितीच्या बैठकीत घेण्यात आला.