नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर पहिली प्रवासी सिम्युलेशन चाचणी अत्यंत शिस्तबद्ध आणि उत्साहपूर्ण वातावरणात पार पडली. 29 आणि 30 नोव्हेंबर या दोन दिवसांत तब्बल 1600 स्वयंसेवकांनी प्रवासी म्हणून सहभाग घेत विमानतळाच्या सर्व सेवांची कसून परीक्षा घेतली. विमानतळ प्रशासनाने या चाचणीचे व्हिडिओदेखील सार्वजनिक केले असून देशभरातील विमानप्रेमी आता एका तारखेकडे आतुरतेने पाहत आहेत. 25 डिसेंबर, ज्या दिवशी या अत्याधुनिक विमानतळावरून पहिले व्यावसायिक उड्डाण होणार आहे.
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ नाताळ २५ डिसेंबरपासून सुरू होणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पहिल्या दिवशी नवी मुंबई विमानतळ सकाळी ८ ते रात्री ८ वाजेपर्यंत १२ तास सुरू राहिल आणि दररोज २३ डिपार्टर होतील. विमानतळ दररोज एका तासात १० विमानांच्या ये-जा चं व्यवस्थापन करेल.

25 डिसेंबरला बंगळुरूहून येणार पहिलं विमान
२५ डिसेंबर रोजी एनएमआय म्हणजेच नवी मुंबई विमानतळावर पोहोचणारं विमान बंगळुरूहून उड्डाण करेल. पहिलं विमान इंडिगोचं असेल. हे सकाळी ८ वाजता नवी मुंबई विमानतळावर लँड करेल. यानंतर इंडिगोचं एक विमान सकाळी ८.४० वाजता हैद्राबादहून रवाना होईल. ही पहिलीच आउटबाउंड सेवा असेल. एनएमआयएने जारी केलेल्या निवेदनानुसार, सुरुवातीच्या लाँच दरम्यान प्रवाशांना इंडिगो, एअर इंडिया एक्सप्रेस आणि अकासा एअर द्वारे दिल्या जाणाऱ्या सेवांचा फायदा होईल, ज्यामुळे मुंबई १६ प्रमुख देशांतर्गत स्थळांशी जोडली जाईल.
बंगळुरू आणि दिल्लीसाठी डेली सर्व्हिस
आकाशात विमान झेपावण्यासाठी अखेर नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ (NMIA) सज्ज झालेले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, 25 डिसेंबरपासून विमानतळावरून विमान आकाशात झेपावणार आहे. ज्यासाठी एअर इंडिया एक्सप्रेसने बुकिंग देखील सुरू केली आहे. एअर इंडिया एक्सप्रेसकडून नवी मुंबई ते बेंगळुरू दिवसाला एक विमानाचं उड्डाण आणि दिल्लीला आठवड्यातून पाच उड्डाणे चालवले जाणार आहे. १ जानेवारीपासून, दोन्ही मार्गांवरील विमानाच्या फेऱ्या दुप्पट केल्या जाण्याच्या शक्यता आहे. बेंगळुरू आणि दिल्ली दरम्यान दररोज दोन उड्डाणे उपलब्ध असतील.
प्रवाशांसाठी अनेक सोयी आणि सुविधा
विमानतळाची क्षमता दरवर्षी २ कोटी प्रवाशांना हाताळण्याची असेल. इंडिगो, अकासा एअर आणि एअर इंडिया एक्सप्रेस सारख्या अनेक एअरलाइन सहयोगी कंपन्यांनी नवी मुंबई विमानतळावरून देशांतर्गत उड्डाणे चालविण्यास रस दर्शविला आहे. देशांतर्गत उड्डाणे सुरू झाल्यानंतर काही महिन्यांनी, तात्पुरत्या स्वरूपात २०२६ च्या सुरुवातीला आंतरराष्ट्रीय उड्डाणे सुरू होण्याची शक्यता आहे.
- नवी मुंबई विमानतळाचे बांधकाम पाच टप्प्यात करण्याचे नियोजन आहे. अधिकाऱ्यांच्या मते, नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाची अंतिम क्षमता दरवर्षी ९० दशलक्ष प्रवाशांची असेल.
- विमानतळावर अति-जलद सामान हाताळणी प्रणालीचे एक उल्लेखनीय वैशिष्ट्य असेल. वाढीव वेग आणि अचूकतेसाठी ही प्रणाली ३६०-अंश बारकोड स्कॅनिंग वापरेल.
- सामान्य माल, औषध आणि नाशवंत वस्तूंसाठी एक नवीन विशेष एअर कार्गो टर्मिनल बांधले जात आहे. टर्मिनलमध्ये तापमान-नियंत्रित गोदामे आणि उच्च-तंत्रज्ञान स्वयंचलित हाताळणी प्रणालींचा समावेश असेल, ज्यामुळे एनएमआयए पश्चिम आणि मध्य भारतासाठी एक प्रमुख मालवाहतूक प्रवेशद्वार बनेल.











