फलटण येथे घडलेल्या डॉक्टर युवतीच्या आत्महत्येच्या प्रकरणाने संपूर्ण राज्याचे लक्ष वेधून घेतले होते. या घटनेत आरोपी ठरलेल्या निलंबित पोलीस उपनिरीक्षक गोपाळ बदने याच्यावर अखेर निर्णायक कारवाई करण्यात आली आहे. सातारा पोलीस अधीक्षक कार्यालयातून मिळालेल्या माहितीनुसार, बदने याला पोलिस खात्यातून बडतर्फ करण्यात आले आहे. ही कारवाई कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक सुनिल फुलारी यांनी भारतीय संविधानातील अनुच्छेद 311(2)(ब) नुसार केली आहे.
गोपाळ बदने पोलीस खात्यामधून बडतर्फ
गोपाळ बदने याने बेफिकिरीने, नैतिक अध:पतन व दुर्वर्तन, विकृतपणे पोलीस उपनिरीक्षक पदाचा व अधिकारांचा दुरुपयोग केल्याने तसेच समाजामध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण करणारी वर्तणुक केल्याने सुनिल फुलारी विशेष पोलीस महानिरीक्षक कोल्हापूर परिक्षेत्र यांनी भारतीय राज्यघटना 1950 मधील अनुच्धेद 311(2) ब नूसार शासकिय सेवेतून गोपाळ बदने याला पोलीस खात्यातून बडतर्फ करण्यात आला असल्याची माहिती सातारा पोलीस अधीक्षक कार्यालयातून देण्यात आली आहे.

समाजाला मोठा संदेश देण्याचा प्रयत्न
समाजात कायद्याच्या रक्षणासाठी असलेल्या पदाचा दुरुपयोग करणाऱ्यांविरुद्ध शून्य सहनशीलतेचा संदेश सरकार आणि पोलीस विभागाने दिल्याचे मानले जात आहे. फलटण शहरातील एका डॉक्टर युवतीने 23 ऑक्टोबर रोजी आपले आयुष्य संपवले होते. ही घटना स्थानिक हॉटेलमध्ये घडली होती. आत्महत्येपूर्वी तिने तळहातावर लिहून निलंबित पोलीस उपनिरीक्षक गोपाळ बदने याच्याकडून चार वेळा अत्याचार झाल्याचा आणि इंजिनिअर प्रशांत बनकर याच्याकडून सतत मानसिक छळ केल्याचा आरोप केला होता. या नोंदीमुळे दोन आरोपींविरुद्ध गंभीर स्वरूपाची चौकशी सुरू झाली.
फलटणमधील ते प्रकरण नेमकं काय?
फलटण येथील एका डॉक्टर महिलेने निलंबित पोलीस उपनिरीक्षक गोपाळ बदने याने चारवेळा अत्याचार केला तर इंजिनिअर बनकर याने मानसिक छळ केला असे तळहातावर लिहून 23 ऑक्टोबर रोजी फलटण येथील एका हॉटेलमध्ये आत्महत्या केली होती. यानंतर फलटण पोलिसांनी दोघांना अटक केली आहे. तर दुसरीकडे या प्रकरणाचा तपास करत असताना फलटण पोलिसांना दोघांच्या मोबाइलमधून महत्त्वाची माहिती पोलिसांच्या हाती लागली आहे. सध्या या प्रकरणाचा पुढील तपास आयपीएस अधीकारी तेजस्वी सातपुते यांच्या देखरेखीखाली सुरु आहे.











