पुण्यातील रेव्ह पार्टीवर पोलिसांनी छापेमारी केली आहे. पुण्यातील उच्चभ्रू खराडी भागात रेव्ह पार्टी सुरू होती. विशेष म्हणजे या रेव्ह पार्टीतून एकनाथ खडसेंचा जावई आणि रोहिणी खडसेंचा पती प्रांजल खेवलकरला अटक करण्यात आली आहे. पार्टीमध्ये मोठ्या प्रमाणावर अमली पदार्थ, दारू, हुक्का घेत असल्याचं उघडकीस आलं आहे. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत असून अटकेत असलेल्यांना पुण्यातील ससून रूग्णालयात तपासणीसाठी दाखल करण्यात आल्याची माहिती आहे.
एकनाथ खडसेंच्या जावयाला अटक
पुण्यात उच्चभ्रू खराडी भागात रेव्ह पार्टी सुरू होती. पुणे पोलिसांनी छापेमारी करीत ही पार्टी उद्ध्वस्त केली आहे. धक्कादायक बाब म्हणजे पुण्यातील या रेव्ह पार्टीमध्ये भाजप नेते एकनाथ खडसे यांच्या जावयाचा सहभाग होता. पुण्यातील रेव्ह पार्टीवर पोलिसांनी छापेमारी केली आहे. पुण्यातील उच्चभ्रू खराडी भागात रेव्ह पार्टी सुरू होती. पार्टीमध्ये मोठ्या प्रमाणावर अमली पदार्थ, दारू, हुक्का घेत असल्याचं उघडकीस आलं आहे. या पार्टीमध्ये भाजप नेते एकनाथ खडसे यांची कन्या रोहिणी खडसे हिचा पती प्रांजल खेवलकर याचा सहभाग होता.

पोलिसांकडून प्रकरणाचा तपास सुरू
खराडी भागातील एका फ्लॅटमध्ये हाऊस पार्टीचं आयोजन करण्यात आलं होतं. त्यावेळी या फ्लॅटमध्ये अमली पदार्थ, दारू आणि हुक्काचं सेवन केलं जात असल्याचं समोर आलं आहे. हाऊस पार्टीच्या नावाखाली येथे रेव्ह पार्टी सुरू होती. रेव्ह पार्टी करणाऱ्यांमध्ये तीन महिला आणि दोन पुरुषांचा समावेश होता. २६ जुलै रोजी रात्री उशीरा ही छापेमारी करण्यात आली. या छापेमारीमद्ये अमली पदार्थ, हुक्का आणि दारू जप्त करण्यात आले आहे. पुणे पोलिसांनी हाऊस पार्टीतून प्रांजल खेवलकरांसह आणखी एकाला अटक केली आहे.
या प्रकरणात आता पोलिसांकडून अधिकचा तपास सुरू करण्यात आल्याची माहिती आहे. विशेष म्हणजे या ठिकाणी आणलेले ड्रग्ज, अंमली पदार्थ नेमके कुठुन आले? याचा देखील पोलिसांकडून शोध घेतला जात आहे.











