MP Breaking News
Fri, Dec 19, 2025

पुणे मेट्रोचा पदवीपर्यंत शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना मोठा दिलासा; विद्यार्थ्यांना करता येणार मोफत प्रवास

Written by:Rohit Shinde
Published:
पुणे मेट्रोने विद्यार्थ्यांसाठी खास सवलतीची योजना सुरू केली असून, 25 जुलै ते 15 सप्टेंबर 2025 या कालावधीत 'वन पुणे स्टुडंट पास कार्ड' मोफत दिले जाणार आहे.
पुणे मेट्रोचा पदवीपर्यंत शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना मोठा दिलासा; विद्यार्थ्यांना करता येणार मोफत प्रवास

पुणे मेट्रोला प्रवाशांचा प्रतिसाद अलीकडच्या काळात काहीसा वाढताना दिसत आहे. पुणे मेट्रोल पदवीपर्यंत शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी एक खास योजना सुरू केली आहे. णे मेट्रोने विद्यार्थ्यांसाठी खास सवलतीची योजना सुरू केली असून, 25 जुलै ते 15 सप्टेंबर 2025 या कालावधीत ‘वन पुणे स्टुडंट पास कार्ड’ मोफत दिले जाणार आहे. नव्या शैक्षणिक वर्षाच्या पार्श्वभूमीवर शाळा आणि महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना सार्वजनिक वाहतूक स्वीकारण्यास प्रोत्साहित करण्याचा हेतू या योजनेमागे आहे. त्यामुळे आगामी काळात मेट्रोकडे विद्यार्थ्यांचा ओढा वाढावा यासाठी हे पाऊल उचलण्यात आल्याची माहिती समोर येत आहे.

विद्यार्थ्यांना मेट्रोकडून मोठा दिलासा

सामान्यतः ₹118 किमतीचे हे कार्ड आता निशुल्क मिळणार असून, कार्ड काढताना किमान ₹200 चा टॉप-अप आवश्यक आहे. विशेष म्हणजे, हे संपूर्ण रक्कम कार्डवर शिल्लक म्हणून मिळेल आणि कोणताही अतिरिक्त शुल्क आकारला जाणार नाही. ही सुविधा पदवीपर्यंत शिकणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध आहे. 18 वर्षांखालील विद्यार्थ्यांसाठी कार्ड पालकांच्या किंवा संरक्षकाच्या नावावर जारी केले जाईल, वैध KYC कागदपत्रांच्या आधारे.

या कार्डद्वारे पुणे मेट्रोच्या सर्व प्रवासांवर 30% पर्यंत तिकीट सवलत मिळणार आहे ज्यामुळे विद्यार्थ्यांचा रोजचा प्रवास अधिक परवडणारा ठरेल. पुणे मेट्रो प्रकल्पाचा पहिला टप्पा पूर्ण झाला असून यामधील 29 स्थानके प्रवासी सेवेत दाखल झाली आहेत. विद्यार्थीवर्गाला या निर्णयामुळे मोठा दिलासा मिळणार आहे.

मेट्रोचे प्रवासी वाढविण्याचा प्रयत्न

पुणे मेट्रोच्या पहिल्या टप्प्याला अपेक्षेप्रमाणे प्रतिसाद मिळालेला नाही. अद्याप संपूर्ण मार्ग पूर्ण न झाल्यामुळे प्रवाशांची संख्या मर्यादित आहे. अनेक प्रवासी मेट्रोऐवजी खाजगी वाहने, PMPML बस किंवा रिक्षा यांवर अधिक अवलंबून आहेत. मेट्रो स्टेशनपर्यंत पोहोचण्यासाठी अपुरी वाहतूक सुविधा, अपूर्ण कनेक्टिव्हिटी, आणि प्रवासाचा वेळ वाचत नसल्यामुळे नागरिक मेट्रोचा वापर कमी करत आहेत. काही स्टेशनवर पार्किंग, लिफ्ट, आणि योग्य प्रवेश सुविधा नाहीत. मेट्रोचे फायदे लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी जागरूकतेचा अभावही आहे. तरीही पुढील टप्पे पूर्ण झाल्यावर आणि सेवा सुधारल्यानंतर प्रवाशांची संख्या वाढेल, अशी अपेक्षा आहे.