Marathi News

Pune Navle Bridge Accident : पुण्याच्या नवले ब्रीजवर भीषण अपघात; 20 ते 25 वाहनांचा चुराडा, 7 मृत्यू

Published:
अचानक घडलेल्या या विचित्र अपघातामुळे वाहतूक कोंडी झाली. दरम्यान या अपघाताची माहिती मिळताच अग्निशमन दलाचं पथक घटनास्थळी दाखल झालं आहे
Pune Navle Bridge Accident : पुण्याच्या नवले ब्रीजवर भीषण अपघात; 20 ते 25 वाहनांचा चुराडा, 7 मृत्यू

Pune Navle Bridge Accident | पुण्याहून अपघाताची एक धक्कादायक घटना समोर येत आहे. पुण्यातील नवले ब्रीज येथे कंटेनरने 20 ते 25 वाहनांना चेंडूप्रमाणे उडवत त्यांचा अक्षरश: चुराडा केला आहे. या अपघातानंतर दोन ट्रकला आग लागली असून, या दोन ट्रकच्यामध्ये एक कार अडकली आहे. पोलिसांनी  घटनास्थळी  धाव घेतली असून अग्निशमन दलाच्या गाड्याही नवले  ब्रीजवर पोहोचल्या आहेत. लोकांमध्ये भीतीचे वातावरण असून परिस्थिती आटोक्यात आणण्याचा प्रयत्न सुरू आहे.

नेमकं काय घडलं? Pune Navle Bridge Accident

मिळालेल्या माहितीनुसार, कंटनेर नवले पुलाच्या पुढे असणाऱ्या बोगद्यातून पुण्याच्या दिशेन येत होता. उतारावर कंटेनरचा ब्रेक फेल झाला. यानंतर कंटेनरने समोर येतील त्या सगळ्या गाड्यांना धडक दिली. जवळपास 3 किमी कंटेनर वाहनांना धडक देत होता. यादरम्यान तब्बल 20 ते 25 गाड्यांचे मोठ नुकसान झालं. याचवेळी या कंटेनरने दुसऱ्या एका कंटेनरला जोरदार धडक दिली आणि या अपघाताची तीव्रता आणखी वाढली. दोन्ही कंटेनरच्या मध्ये एक कार अडकली आणि भीषण आग लागली. कार मधील प्रवासी अक्षरश जळाले. Pune Navle Bridge Accident

7 जणांचा मृत्यू

या घटनेत सात जणांचा मृत्यू झाला असून, मृतांची संख्या आणखी वाढू शकते, अशी भीती व्यक्त केली जात आहे. अचानक घडलेल्या या विचित्र अपघातामुळे वाहतूक कोंडी झाली. दरम्यान या अपघाताची माहिती मिळताच अग्निशमन दलाचं पथक घटनास्थळी दाखल झालं आहे. आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आलं आहे. मात्र अजूनही ही कार या दोन्ही ट्रकच्या मध्ये अडकलेलीच आहे, तिला बाहेर काढण्याचा प्रयत्न आता अग्निशमन दल आणि पुणे पोलिसांकडून सुरू आहे. खरं तर नवले ब्रीजवर सातत्याने अपघाताच्या घटना घडतात, आज पुन्हा एकदा येथे भीषण अपघाताची घटना घडल्याने पुणेकरांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा उपस्थित झाला आहे.

Asavari Khedekar Burumbadkar
लेखकाबद्दल
आसावरी ओंकार बुरुंबाडकर गेली 4 वर्ष पत्रकारितेत काम करत आहे. सध्या MP मराठी Breaking मध्ये डिजिटल कंटेट रायटर म्हणून कार्यरत आहे. आसावरीला मनोरंजन, अध्यात्म, लाईफस्टाईल अशा विविध विषयांमध्ये रुची आहे. यापूर्वी तिने एबीपी माझा, रत्नागिरी टाईम्स या मीडिया हाऊसमध्ये काम केलं आहे. डिजिटल माध्यमात काम करताना वृत्तपत्रांमध्ये विविध विषयावर लिखाण केलं आहे. डिजिटलमध्ये काम करताना ती वाचनाची आणि लिखाणाचीही आवड जपते. View all posts by Asavari Khedekar Burumbadkar
Follow Us :GoogleNews