MP Breaking News
Sat, Dec 20, 2025

Pune Palkhi 2025 Live Tracking : माऊलींची पालखी कुठपर्यंत पोहोचली? एक क्लिकवर कळेल लोकेशन

Written by:Smita Gangurde
Published:
आज दुपारी या दोन्ही पालख्या पुण्यात मुक्कामी आल्या आहेत. त्यामुळे माऊलीच दर्शन घेण्यासाठी पुणेकरांनी मोठ्या संख्येने गर्दी केली आहे.
Pune Palkhi 2025 Live Tracking : माऊलींची पालखी कुठपर्यंत पोहोचली? एक क्लिकवर कळेल लोकेशन

5 जुलैपर्यंत वारकरी तहान-भूक विसरून पंढरीच्या विठ्ठलाचं नामस्मरण करत एक एक पाऊल पुढे जात राहतील. मनी फक्त एकच इच्छा…विठ्ठलाचं साजरं रुप डोळ्यात साठवून घ्यायचं. १८ जूनला देहूतून तुकारामाची पालखी आणि १९ जूनला आळंदीतून ज्ञानेश्वरांच्या पालखीचं प्रस्थान झालं. आज दुपारी या दोन्ही पालख्या पुण्यात मुक्कामी आल्या आहेत. त्यामुळे माऊलीच दर्शन घेण्यासाठी पुणेकरांनी मोठ्या संख्येने गर्दी केली आहे.

पुणे पोलिसांची पालखी ट्रॅकिंग सुविधा...

दरम्यान दोन्ही पालख्यांचे अपडेट तुम्हाला एक क्लिकवर उपलब्ध असणार आहेत. पुणे पोलिसांनी पालखी ट्रॅकिंग सुविधा सुरू केली असून माऊलींचं दर्शन घेण्यासाठी किंवा पालखीत सामील होणाऱ्यांना या ऑनलाइन पालखी ट्रॅकिंग सुविधेमुळे मोठा फायदा होणार आहे. https://diversion.punepolice.gov.in/palkhi/track या लिंकवर क्लिक करून तुम्ही संत तुकाराम महाराज आणि संत ज्ञानेश्वर महाराज या दोन्ही पालख्यांचे अपडेट मिळवू शकता.

पुण्यात वाहतुकीत मोठे बदल...

संत तुकाराम महाराज आणि माऊली महाराजांची पालखी आज पुण्यात मुक्कामी असणार आहे. पुणे शहरातील वाहतुकीत मोठे बदल करण्यात आले आहेत. पुणे शहरातील प्रमुख 20 रस्ते आज वाहतुकीसाठी बंद असतील. दोन्ही पालख्या ज्या ठिकाणी मुक्कामी असतील तेथे दोन दिवस वाहनांना पूर्णपणे बंदी असेल. पुण्यातील फर्ग्युसन कॉलेज रोड आणि जंगली महाराज रोडवरही दुपारनंतर वाहनांना पूर्णपणे बंदी असेल.

Pune Palkhi 2025
शहरातील या मुख्य रस्त्यांवर वाहतुकीत बदल

आज सकाळी आठ ते रात्री बारा वाजेपर्यंत रेंजहिल चौक ते संचेती चौक (गणेशखिंड रस्ता), डेक्कन जिमखाना येथील खंडोजीबाबा चौक ते वीर चापेकर चौक (नामदार गोपाळकृष्ण गोखले रस्ता – फर्ग्युसन रस्ता), गाडगीळ पुतळा चौक ते स. गो. बर्वे चौक (छत्रपती शिवाजी रस्ता), आपटे रस्ता, नामदार गोपाळकृष्ण गोखले रस्ता ते टिळक रस्ता, लक्ष्मी रस्ता (टिळक चौक ते संत कबीर चौक), शनिपार चौक ते सेवासदन चौक, नेहरू चौक ते सोन्या मारुती चौक, गणेश रस्त्यावरील देवजीबाबा चौक ते हमजेखान चौक, नेहरू रस्त्यावरील रामाेशी गेट ते पालखी विठोबा मंदिर, संत कबीर चौक ते चाचा हलवाई चौक हे मार्ग वाहतुकीसाठी बंद राहणार आहे.