MP Breaking News
Sun, Dec 21, 2025

पुणेकरांची वर्षभराची पाण्याची चिंता मिटली; मुसळधार पावसामुळे खडकवासला धरणात 81% पाणीसाठा

Written by:Rohit Shinde
Published:
खडकवासला धरणक्षेत्रातील पाणीसाठ्यात लक्षणीय वाढ झाली आहे. सध्या या धरण समूहात 80.98 टक्के पाणीसाठा उपलब्ध आहे. पुणेकरांची वर्षभराची पाण्याची चिंता मिटली आहे.
पुणेकरांची वर्षभराची पाण्याची चिंता मिटली; मुसळधार पावसामुळे खडकवासला धरणात 81% पाणीसाठा

पुणे शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या खडकवासला धरण साखळीतून एक अत्यंत दिलासादायक बातमी समोर आली आहे. यंदाच्या सुरुवातीच्या पावसामुळे खडकवासला धरणक्षेत्रातील पाणीसाठ्यात लक्षणीय वाढ झाली आहे. धरणातून सद्यस्थितीला काही प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरू आहे. वाढलेल्या पाणीसाठ्यामुळे पुणे शहराची वर्षभराची पाण्याची चिंता मिटली आहे.

खडकवासला धरणात 81% पाणीसाठा

यंदाच्या सुरुवातीच्या पावसामुळे खडकवासला धरणक्षेत्रातील पाणीसाठ्यात लक्षणीय वाढ झाली आहे. सध्या या धरण समूहात 80.98 टक्के पाणीसाठा उपलब्ध आहे. हा साठा 23.60 टीएमसी इतका असून गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा 7 टीएमसी जास्त पाणीसाठा उपलब्ध झाला आहे. यामुळे पुणेकरांवरील पाणीटंचाईचे संकट काही प्रमाणात दूर झाले आहे.

खडकवासला धरणक्षेत्रात एकूण चार प्रमुख धरणे समाविष्ट आहेत. यात खडकवासला धरण, पानशेत धरण, वरसगाव धरण आणि टेमघर धरणाचा समावेश आहे. या सर्व धरणांमधून पुणे शहराला पाणीपुरवठा केला जातो. यंदाचा विचार केला तर खडकवासला धरणात 1.05 टीएमसी, पानशेत धरणातर 8.75 टीएमसी, वरसगाव धरणात 11.01 टीएमसी आणि टेमघर धरणा 2.80 टीएमसी पाणीसाठी उपलब्ध आहे. या चारही धरणांतील एकत्रित पाणीसाठा सध्या 23.60 टीएमसी इतका आहे.

मागील वर्षी याच काळात खडकवासला धरणक्षेत्रात केवळ 17.98 टीएमसी (61.12 टक्के) पाणीसाठा उपलब्ध होता. या तुलनेत यंदा 7 टीएमसी पाणीसाठा अधिक असल्याने पुणेकरांना मोठा दिलासा मिळाला आहे.

खडकवासला धरणातून पाण्याचा विसर्ग

धरणक्षेत्रात पाण्याची आवक वाढल्याने आणि पाणीसाठा नियंत्रित ठेवण्यासाठी खडकवासला धरणक्षेत्रातून मुळा-मुठा नदीत 5 टीएमसी पेक्षा जास्त पाणी विसर्ग करण्यात आले आहे. यामुळे नदीकाठच्या रहिवाशांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. यंदाच्या पावसाळ्यात धरणांमध्ये चांगला पाणीसाठा झाल्याने पुणे शहराची पाण्याची चिंता काही काळापुरती मिटली आहे. आगामी काळात पावसाचे प्रमाण आणखी वाढणार असल्याने पाणीसाठा आणखी वाढणार आहे.