रेल्वेतील भरती ही सरकारी नोकरीच्या शोधात असलेल्या तरूणांसाठी नेहमीच सुवर्णसंधी असते. रेल्वे रिक्रुटमेंट बोर्डातर्फे एनटीपीसी म्हणजेच नॉन टेक्निकल पॉप्युलर कॅटेगिरीमधील विविध रिक्त पदांसाठी भरतीची घोषणा करण्यात आली आहे. देशभरात तब्बल 8 हजार 875 जागांवर पात्र अर्जदारांची नियुक्ती केली जाणार आहे. ही भरती पदवीधर आणि 12वी उत्तीर्ण असलेल्या अर्जदारांसाठी नोकरीची उत्तम संधी आहे. या पदांवरील भरतीसाठी ऑनलाईन अर्ज करता येणार आहेत, त्याबाबतची प्रक्रिया सविस्तरपणे समजून घेऊ…
रेल्वेत नोकरीची सुवर्णसंधी
देशभरात तब्बल 8 हजार 875 जागांवर पात्र अर्जदारांची नियुक्ती केली जाणार आहे. ही भरती पदवीधर आणि 12वी उत्तीर्ण असलेल्या अर्जदारांसाठी नोकरीची उत्तम संधी आहे. नटीपीसी कॅटेगरीतील पदांची विभागणी पदवीधर आणि 12वी उत्तीर्ण अशा 2 प्रकारात केलेली आहे. या भरतीतील विविध पदांसाठी अर्ज करण्यासाठी अर्जदाराचे कोणत्याही शाखेतील पदवी शिक्षण पूर्ण असणे आवश्यक आहे, तसेच या भरतीत बारावी उत्तीर्ण उमेदवार देखील सहभागी होऊ शकतात. अर्जदाराची 12वी 50 टक्के गुणांसह पूर्ण असावी. या भरतीत अर्ज करण्यासाठी इच्छुक असलेल्या अर्जदारांना टायपिंग येणे आवश्यक आहे. अर्जदाराने संगणकावरील हिंदी आणि इंग्रजी टायपिंग पूर्ण केलेली हवी.

पद आणि त्यानुसार वयोमर्यादा
भारतात रेल्वेतील नोकरीचे फायदे
भारतात रेल्वेतील नोकरी ही सर्वात स्थिर आणि प्रतिष्ठित नोकऱ्यांपैकी एक मानली जाते. या नोकरीचे प्रमुख फायदे म्हणजे नोकरीतील स्थैर्य, नियमित पगार, पेन्शन सुविधा, आणि विविध भत्ते जसे की प्रवास भत्ता, निवास सुविधा, वैद्यकीय सेवा इत्यादी. रेल्वे कर्मचाऱ्यांना त्यांच्या कौशल्यानुसार बढतीच्या संधी, प्रशिक्षण आणि विविध विभागांमध्ये काम करण्याची संधी मिळते. तसेच, रेल्वेतील नोकरीमुळे सामाजिक प्रतिष्ठा आणि आर्थिक सुरक्षितता प्राप्त होते. केंद्र सरकारच्या नोकरीचा दर्जा असल्यामुळे कर्मचाऱ्यांना विविध सुट्टीच्या सुविधा आणि निवृत्तीवेतन योजना उपलब्ध असतात. त्यामुळे रेल्वेतील नोकरी ही तरुणांसाठी आकर्षक आणि स्थिर करिअरचा मार्ग ठरते.











