Rain Alert: महाराष्ट्रातील पावसाबाबत हवामान विभागाकडून मोठी अपडेट; ‘या’ जिल्ह्यांसाठी यलो अलर्ट जारी

महाराष्ट्रातील पावसाबाबत हवामान विभागाकडून मोठी अपडेट समोर आली आहे. कारण पुढील काही दिवसांत राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये अवकाळी पावसाची शक्यता हवामान विभागाकडून वर्तविण्यात आली आहे.

नैऋत्य मानसूने महाराष्ट्रातून माघार घेतल्यानंतर राज्यात बहुतांश भागात कोरडे हवामान पाहायला मिळत आहे. काही जिल्ह्यांत पोषक वातावरण तयार झाल्याने जसे की, कोल्हापूर आणि सिंधुदुर्ग या दोन जिल्ह्यांना पुढील तीन दिवसांसाठी हवामान विभागाने यलो अलर्ट दिला आहे. तर नांदेडला पुढील दोन दिवसांसाठी यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. विदर्भात देखील 21 तारखेपासून पाऊस सक्रिय होण्याची चिन्हे आहेत. पावसाबाबत हवामान विभागाने वर्तविलेला अंदाज जाणून घेऊ….

राज्यातील काही जिल्ह्यांत पावसाची शक्यता

मुंबई शहर आणि उपनगरात सामान्यतः निरभ्र आकाश राहण्याची शक्यता आहे. कोकणातील सिंधुदुर्गला येलो अलर्ट देण्यात आला आहे. पश्चिम महाराष्ट्रात कोल्हापूर जिल्ह्याला पुढील तीन दिवसांसाठी येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. तसेच सह्याद्रीच्या घाट भागांमध्ये आणि सांगली जिल्ह्यामध्ये तुरळक ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता आहे.

उत्तर महाराष्ट्र मध्ये मुख्यतः निरभ्र आकाश आणि कोरडा हवामान पाहायला मिळेल. उत्तर महाराष्ट्रामध्ये पुढील काही दिवस पावसाची कोणतीही शक्यता नाही. नाशिक सह आसपासच्या जिल्ह्यांमध्ये किमान तापमानात घट पाहायला मिळत असून यामुळे थंडी वाढण्याची देखील शक्यता आहे.

मराठवाडा-विदर्भात कुठे पाऊस बरसणार?

मराठवाड्यातील नांदेड जिल्ह्याला 20 ऑक्टोबर साठी हवामान विभागाने येलो अलर्ट जारी केला. तर 21 ऑक्टोबर साठी परभणी हिंगोली आणि नांदेड या तीन जिल्ह्यांना येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. त्याचबरोबर पुढील दोन दिवस मराठवाड्यातील बीड धाराशिव लातूर या जिल्ह्यांमध्ये हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता आहे.

विदर्भामध्ये मागील काही दिवसांपासून स्वच्छ हवामान पाहायला मिळालं परंतु 21 ऑक्टोबर पासून विदर्भामध्ये पुन्हा एकदा पाऊस सक्रिय होण्याची चिन्हे आहेत 21 22 आणि 23 ऑक्टोबर रोजी विदर्भातील सर्व जिल्ह्यांमध्ये हलक्यातील मध्यम पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली. तर 23 ऑक्टोबर रोजी साठी विदर्भातील सर्व जिल्ह्यांना हवामान विभागाने येलो अलर्ट जारी केला आहे.

रब्बी हंगामावर संकट, शेतकरी चिंतेत

सततच्या पावसाळी आणि ढगाळ वातावरणामुळे राज्यातील रब्बीचा हंगाम देखील मागास होण्याची चिन्हे सध्या दिसत आहेत. दरम्यान नैऋत्य मान्सून राज्यातून पूर्णपणे माघारी फिरला आहे. तयार झालेल्या पोषक हवामानामुळे राज्यामध्ये काही जिल्ह्यांमध्ये हलक्यातील मध्यम सरींची शक्यता हवामाना विभाग आणि आगामी काळामध्ये वर्तवली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी हवामानाचा अंदाज लक्षात घेऊन शेती कामाचे नियोजन करावे असं आवाहन देखील करण्यात आला आहे. शेतकरी सध्या चिंतेत आहेत.


About Author

Rohit Shinde

Other Latest News