हवामान विभागाकडून पावसाबाबत मोठी अपडेट समोर येत आहे. आज देखील भारतीय हवामान विभागाने पावसाचा अत्यंत मोठा इशारा दिला आहे. दसरा जाऊन दिवाळी आली असतानाही अजूनही पाऊस कमी होण्याचे नाव घेत नाही. 15 जिल्ह्यांमध्ये पावसाचा इशारा देण्यात आला आहे. राज्यात पावसाला पोषक वातावरण निर्माण झाले असून काल अनेक भागांमध्ये जोरदार वाऱ्यासह मुसळधार पावसाने हजेरी लावली. पुढील 24 तासांत अनेक भागांमध्ये मुसळधार अवकाळी पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.
राज्यात अवकाळी पावसाची शक्यता
भारतीय हवामान खात्याने दिलेल्या अंदाजानुसार, आज मध्य महाराष्ट्र, कोकण आणि मराठवाड्यातील काही भागांमध्ये विजांच्या कडकडाटासह पाऊस होईल. अरबी समुद्रातील लक्षव्दीप बेटाजवळ समुद्र सपाटीपासून 5.8 उंचीवर वारे वाहत आहे. केरळ, कर्नाटक किनाऱ्यालगत कमी दाबाचा पट्टी निर्माण झाला. यामुळे राज्यातील काही भागात जोरदार पावसाची हजेरी बघायला मिळती आहे.

राज्यातून मान्सून गेला असला तरीही पुढील काही दिवस राज्यात पावसाचे ढग कामयमच राहणार आहेत. 19 आँक्टोबरपर्यंत राज्यात पाऊस असणार आहे. या पावसाचा अधिक प्रभाव कोकण किनारपट्टी भागात जाणवणार आहे. किनारपट्टी भागात विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता असणार आहे. पावसाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने नागरिकांना सर्तक राहण्याचा इशारा दिला आहे. 15 जिल्हांना पावसाचा अलर्ट देण्यात आला आहे. मराठवाडा, विदर्भाचा काही भाग आणि पश्चिम महाराष्ट्रात या काळात पाऊस बरसेल.
कोकण किनारपट्टीवर पावसाचा अंदाज
ठाणे आणि नवी मुंबई परिसरात सकाळी ढगाळ वातावरण राहणार आहे. दुपारनंतर काही ठिकाणी हलक्या सरी कोसळण्याची शक्यता आहे. दिवाळी अगदी दारात आली असतानाच कोकण किनारपट्टीवर पावसाने पुन्हा एकदा हजेरी लावली आहे. काही दिवस शांत झालेला पाऊस गेल्या दोन दिवसांत पुन्हा सक्रिय झाला असून, ठिकठिकाणी रिमझिम सरी बरसताना दिसत आहेत. आज, 17 ऑक्टोबर 2025 रोजी, वातावरणात थोडा बदल जाणवेल. काही भागांत हलका पाऊस पडेल, तर काही ठिकाणी कोरडे हवामान टिकून राहील.
रायगड, पालघर, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या किनारी जिल्ह्यांमध्ये आज हलक्यापासून मध्यम पावसाच्या सरी कोसळत आहेत. गेल्या काही दिवसांपासून या भागात पावसाची अधूनमधून उपस्थिती कायम आहे. आजही आकाश ढगाळ राहील, तसेच दुपारनंतर सरींचा जोर वाढू शकतो.











