MP Breaking News
Wed, Dec 17, 2025

‘तुम्ही या कृतीने छेद दिलात’; काँग्रेस खासदार वर्षा गायकवाडांचं राज ठाकरेंकडून अभिनंदन

Written by:Smita Gangurde
Published:
वर्षा गायकवाड यांचं कौतुक करणारं पत्रक राज ठाकरे ठाकरेंनी काढलंय.
‘तुम्ही या कृतीने छेद दिलात’; काँग्रेस खासदार वर्षा गायकवाडांचं राज ठाकरेंकडून अभिनंदन

मुंबई- मुंबईत सध्या हिंदी विरुद्ध मराठी हा वाद सुरु आहे. पहिलीपा,सून हिंदी सक्तीवरुन सुरु झालेल्या या वादात भाजपा खासदार निशिकांत दुबे यांनी उढी घेतलीय. ठाकरे बंधूंना महाराष्ट्राबाहेर आपटून आपटाून मारु असं वक्तव्य त्यांनी केलं होतं. यावरकुन जोरदार राजकारण तापलं. या दुबेंना संसद परिसरात महाराष्ट्राच्या तीन महिला काँग्रेस खासदारांनी जाब विचारला होता. त्यातील वर्षा गायकवाड यांचं अभिनंदन आता राज ठाकरेंकडून करण्यात आलंय.

राज ठाकरेंकडून वर्षा गायकवाड यांचं अभिनंदन

वर्षा गायकवाड यांचं कौतुक करणारं पत्रक राज ठाकरे ठाकरेंनी काढलंय. त्यात त्यांनी लिहिलंय की, मराठी माणसांना आपटून आपटून मारु, अशी दर्पोक्ती करणाऱ्या निशिकांत दुबेला तुम्ही संसदेत घेराव घातलात आणि त्याला जाब विचारलात याबद्दल तुमचं मनापासून अभिनंदन. महाराष्ट्राचा, मराठी माणसाचा, मराठी भाषेचा अपमान, त्यावर हल्ली सर्रास अन्याय होत असताना, संसदेत महाराष्ट्राचं प्रतिनिधित्व करणारे खासदार गप्प असतात असं चित्र मराठी जनांच्या समोर येत होतं, त्याला तुम्ही या कृतीने छेद दिलात. याबद्दल बरंच मनापासून आभार.

raj

महाराष्ट्राला सध्या ‘व्यापक भूमिका घेण्याच्या विचारांनी आसलेलं आहे. माझ्या मते हा उभाच ओढवून घेतलेला न्यूनगंड आहे. महाराष्ट्राने देशाचा विचार केला पाहिजे हे खरे आहे. कारण देशाचा विचार करावा आणि देशासाठी काही करावं अशी क्षमता असलेली जी काही मोजकी राज्य आहेत, त्यात महाराष्ट्र अग्रेसर आहे. पण म्हणून आपण मराठी आहोत, मराठी जनतेने आपल्याला निवडून दिलं आहे. त्यामुळे या जनतेप्रती, या प्रांताबद्दल आपली जबाबदारी पहिली आहे. याचा विसर पडायला लागला आहे. यामुळेच सव्वाशे वर्ष हिंद प्रांतावर राज्य करणाऱ्या, आणि १८५७ चा उठाव असू दे की पुढचा स्वातंत्र्य लढ्याला आकार देणाऱ्यात मरहट्टे होते याचा आपल्याला विसर पडतो आणि म्हणूनच या उत्तरेतील मुजोरांना दिल्लीत सातत्याने महाराष्ट्र आणि मराठी माणसाची ताकद दाखवलीच पाहिजे, आणि तुम्ही ती दाखवलीत याबद्दल मनापासून आभार.

महाराष्ट्रातील इतर ४५ खासदार गप्प का बसले माहीत नाही, पण तुम्ही हिंमत दाखवलीत याबद्दल तुमचे कौतुक करावं तेवढं कमी आहे. महाराष्ट्रासाठी तुमचा संसदेतील आवाज असाच बुलंद राहील अशी आशा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची आहे. महाराष्ट्र, मराठी भाषा आणि मराठी माणूस या समोर कोणतेही आपले वैचारिक मतभेद अत्यंत क्षुद्र आहेत.

राज ठाकरेंचा काँग्रेसशीही जवळीकीचा प्रयत्न?

रविवारी राज ठाकरेंनी उद्धव ठाकरेंच्या वाढदिवशी मातोश्रीवर जात त्यांना शुभेच्छा दिल्या होत्या. त्यानंतर ठाकरे बंधूंच्या युतीची चर्चा पुन्हा जोर धरताना दिसतेय. मराठीच्या मुद्द्यावर ठाकरे बंधू एकत्रित महापालिका निवडणुकांना सामोरं जाण्याची शक्यता आहे. अशा वेळी काँग्रेसच्या खासदारांचं कौतुक करुन मविआशी जवळीक साधण्याचा राज ठाकरेंचा हा प्रयत्न आहे का, याचीही चर्चा आता जोर धरताना दिसतेय.