MP Breaking News
Thu, Dec 18, 2025

महसूल अधिकाऱ्यांची आता रोज फेसॲपद्वारे हजेरी लागणार; महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंची घोषणा

Written by:Rohit Shinde
Published:
महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांची आता रोज फेस ॲपद्वारे हजेरी लागणार आहे. महसूल मंत्री बावनकुळेंनी हा महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे.
महसूल अधिकाऱ्यांची आता रोज फेसॲपद्वारे हजेरी लागणार; महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंची घोषणा

महसूल मंत्री झाल्यापासून चंद्रशेखर बावनकुळे अनेक महत्वपूर्ण आणि दूरगामी बदल घडविणारे निर्णय घेत आहेत. महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांची आता रोज फेस ॲपद्वारे हजेरी लागणार आहे. तलाठ्यापासून आता उपजिल्हाधिकारी अधिकाऱ्यांपर्यंत फेस ॲपद्वारे हजेरीचं बंधन असेल. ॲपवर हजेरी न लागल्यास गैरहजर समजलं जाणार आहे.

महसूल अधिकाऱ्यांची हजेरी बंधनकारक

महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी हा एक मोठा निर्णय आता घेतलेला आहे. ज्या गावात नोकरी आहे, तिथूनच उपस्थिती लावली लागणार आहे. कामचुकारपणा करणाऱ्या अधिकाऱ्यांना यामुळे मोठी चपराक बसणार आहे.महसूल विभागाचे सर्व अधिकारी फेस ॲपवर येतील. ज्या गावात त्यांची नोकरी आहे, त्या गावात जावून त्याला फेसॲपवर प्रेझेंटी लावावी लागेल, तिथे हजेरी लागली तरच त्यांचा पगार निघेल. अन्यथा ऑगस्टचा पगार निघणार नाही. फेस ॲप अनिवार्य आहे, ज्या दिवशी फेस ॲपवर नोंदणी केली नाही. त्या दिवशी तो कर्मचारी गैरहजर आहे, असं समजण्यात येईल.

कर्मचाऱ्यांची ‘फेसॲप’वर हजेरी

सरकारने महसूल विभागातील सर्व कर्मचाऱ्यांसाठी आता ‘फेसॲप’द्वारे हजेरी अनिवार्य केली आहे. तलाठीपासून ते जिल्हाधिकाऱ्यांपर्यंत आणि नोंदणी कर्मचाऱ्यांपासून वरिष्ठ अधिकाऱ्यांपर्यंत सर्वांना रोज सकाळी फेसॲपवर उपस्थिती नोंदवावी लागणार आहे. याची अंमलबजावणी ऑगस्टपासून सुरू होणार असून, हजेरी नोंदवली नाही तर संबंधित कर्मचाऱ्यांचा पगार रोखण्यात येईल, असा स्पष्ट इशारा महसूल मंत्री यांनी दिला आहे.

शासनाने यापूर्वीच सूचित केले होते की, कामावर हजर असल्याचे एकमेव प्रमाण म्हणजे ‘फेसॲप’वरची हजेरी असेल. यामुळे यंत्रणेत पारदर्शकता येईल आणि मनमानी गैरहजेरी रोखता येईल, असा प्रशासनाचा दावा आहे. कामचुकार अधिकाऱ्यांना यामुळे चपराक बसणार आहे. या निर्णयाची अंमलबजावणी झाल्यास कार्यक्षमता वाढणार आहे.