पुण्यात उच्चभ्रू खराडी भागात रेव्ह पार्टी सुरू होती. पुणे पोलिसांनी छापेमारी करीत ही पार्टी उद्ध्वस्त केली आहे. धक्कादायक बाब म्हणजे पुण्यातील या रेव्ह पार्टीमध्ये भाजप नेते एकनाथ खडसे यांच्या जावयाचा सहभाग होता. पुण्यातील रेव्ह पार्टीवर पोलिसांनी छापेमारी केली आहे. त्या प्रकरणी रोहिणी खडसेंचे पती प्रांजल खेवलकर अटकेत आहेत. या प्रकरणावर भाष्य करताना सुप्रिया सुळेंनी रोहिणी खडसेंची बाजू घेतली आहे, तसेच ससूनच्या रिपोर्टबाबत भीती व्यक्त केली आहे.
रिपोर्ट बदलला जाण्याची भीती -सुळे
खडसेंच्या जावयाला आता रेव्ह पार्टीप्रकरणी अटक झाल्याने राजकीय वातावरण तापले आहे. यातच सुप्रिया सुळेंनी एका वृत्तवाहिनीशी संवाद साधताना वेगळीच भीती व्यक्त केली आहे. सुळे ससून रुग्णालयात आधी जे काही घडलं त्यावरुन या प्रकरणातील रिपोर्ट बदलण्याचीही शक्यता आहे, असे सुळेंनी म्हटले.
‘रोहिणी खडसेंचा राजीनामा का घ्यावा?’
प्रांजल येवलकरांच्या अटकेमुळे रोहिणी खडसेंच्या राजीनाम्याची मागणी जोर धरत आहे. पण सुप्रिया सुळेंनी मात्र आपण आणि पक्ष त्यांच्या मागे ठाम उभे राहणार असल्याचे भाष्य केले आहे. सुप्रिया सुळे म्हणाल्या, “रोहिणींचा या प्रकरणाशी काय संबंध? त्यांचा नवरा प्रकरणात आहे, मग त्यांचा राजीनामा घ्यायचा का?”सुप्रिया सुळेंनी एक महिला म्हणून खडसेंची बाजू सावरली आहे. ‘एखादी महिला सक्षमपणे उभी राहत असेल तर या पुरुषांना काय त्रास होतोय. काल माधुरी मिसाळ यांच्या बाबत शिरसाट यांनी लिहिलेल पत्र पाहिलं. ती महिला सक्षम आहे. तिला अधिकार आहे बैठका घेण्याचा. मग तुमच्या पोटात का दुखतंय?’ अशा शब्दांत त्यांना सुनावले आहे.
पुण्यात नेमकं काय घडले?
पुण्यात उच्चभ्रू खराडी भागात रेव्ह पार्टी सुरू होती. पुणे पोलिसांनी छापेमारी करीत ही पार्टी उद्ध्वस्त केली आहे. धक्कादायक बाब म्हणजे पुण्यातील या रेव्ह पार्टीमध्ये भाजप नेते एकनाथ खडसे यांच्या जावयाचा सहभाग होता. पुण्यातील रेव्ह पार्टीवर पोलिसांनी छापेमारी केली आहे. पुण्यातील उच्चभ्रू खराडी भागात रेव्ह पार्टी सुरू होती. पार्टीमध्ये मोठ्या प्रमाणावर अमली पदार्थ, दारू, हुक्का घेत असल्याचं उघडकीस आलं आहे. या पार्टीमध्ये भाजप नेते एकनाथ खडसे यांची कन्या रोहिणी खडसे हिचा पती प्रांजल खेवलकर याचा सहभाग होता. प्रांजल खेवलकर अटकेत असून या प्रकरणाचा अधिक तपास सुरू आहे. या प्रकरणावरून आता राजकीय चिखलफेक सुरू झाली आहे.





