Shivsena – दसरा मेळावा म्हटला की, शिवसेनेचा दसरा मेळावा प्रसिद्ध आहे. परंतु 2022 नंतर मूळ शिवसेनेतून एकनाथ शिंदेंनी बंड केल्यानंतर शिवसेनेचे दोन दसरा मेळावा होतात. एक एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचा. तर दुसरा उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचा. दरम्यान, आता एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचा 2 ऑक्टोबर रोजीचा दसरा मेळाव्याचा टिझर जारी करण्यात आला आहे. यातून विरोधकांवर निशाणा साधण्यात आला आहे.
शिवसेनेचा दसरा मेळावा
सोनं विचारांचं देऊ घेऊ मनसोक्त,
भगवे विचार आणि भगवंच रक्त…दिनांक – २ ऑक्टोबर, २०२५
ठिकाण – आझाद मैदान, मुंबई
वेळ – सायंकाळी ६ वाजता#Shivsena #EknathShinde #Maharashtra pic.twitter.com/tdlOKoF8qu— Shivsena – शिवसेना (@Shivsenaofc) September 30, 2025
टिझरमध्ये काय म्हटलंय?
“लांडग्याच्या कळपातून बाहेर आला वाघ. जळून झाले खाक… अशी शिवसैनिकांची आग… ठेचून आणलाय परत धनुष्यबाण…. उंच होते उंच राहील भगव्याची शान… हिंदुत्वासाठी लागते निधडी छाती… लाचारांचा दंगा नको… शिवसैनिकांच्या नावाच्या वाघाशी आप… जन्मात बाद नको… शिवसेनेचा दसरा मेळावा 2 ऑक्टोबर आझाद मैदान. विचारांचा सोनू लुटायला या” असं टीझरमध्ये म्हणण्यात आले आहे. शिवसेनेचा दसरा मेळावा सोनं विचारांचं देऊ घेऊ मनसोक्त, भगवे विचार आणि भगवंच रक्त… दिनांक – २ ऑक्टोबर, २०२५ ठिकाण – आझाद मैदान, मुंबई वेळ – सायंकाळी ६ वाजता. असंही पोस्टमध्ये म्हटलं आहे.
ठाकेंचा दसरा मेळावा शिवाजी पार्क येथे
एकिकडे शिंदेंच्या सेनेच्या दसरा मेळावा आझाद मैदान येथे होणार असल्याचे निश्चित झाले आहे, तर उद्धव ठाकरेंच्या सेनेचा दसरा मेळावा शिवाजी पार्क येथे होणार आहे. पावसामुळं मैदानात चिखल आहे. तरी सुद्दा दसरा मेळावा येथेच होणार असल्याचे खासदार संजय राऊत यांनी सांगितले आहे. तर गेल्यावर्षी प्रमाणे शिंदेंच्या सेनेला दसरा मेळाव्यासाठी आझाद मैदान ही जागा दिली आहे. त्यामुळं आगामी पालिका निवडणुकीच्या धरतीवर दोन्हीकडून ऐकमेकांवर काय टिका केली जाते. आणि शिवसैनिकांना कोणता आदेश दिला जातो, हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.












