मुंबईसह महाराष्ट्रात मुसळधार पाऊस सुरू आहे. पुढील २४ तास महाराष्ट्रातील कित्येक जिल्ह्यांना रेड अलर्ट देण्यात आला आहे. आज काही शाळांना सुट्टी देण्यात आली होती. उद्या २० ऑगस्ट रोजी मुंबईसह महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांतील शाळांना सुट्टी जाहीर झाल्याचं म्हटलं जात आहे. मात्र खरंच २० ऑगस्टलाही शाळांना सुट्टी आहे का? सरकारी निर्णय काय सांगतो, जाणून घेऊया.
मुंबई महानगरपालिकेने दिली माहिती…
१ ठाणे आणि नवी मुंबईतील सर्व सार्वजनिक आणि खासगी शाळा आणि महाविद्यालयांना २० ऑगस्ट रोजी सुट्टी असेल असं एक परिपत्रक सोशल मीडियावरुन व्हायरल होत आहे. मात्र हे पालिकेने काढलेलं नसून ही अफवा आहे. मुंबई महानगरपालिकेने अशा प्रकारचं कुठलंही परिपत्रक काढलेलं नसून येथील शाळा सुरू राहतील.
हा संदेश खोटा आहे. बृहन्मुंबई महानगरपालिकेने आपल्या सोशल मीडियावरून अशी कोणतीही माहिती प्रसारित केलेली नाही.
This message is fake. The Brihanmumbai Municipal Corporation has not issued any such information through its official social media platforms.#MyBMCUpdates… pic.twitter.com/hl0FYRouew
— माझी Mumbai, आपली BMC (@mybmc) August 19, 2025
ठाण्यात शाळांना सुट्टी
ठाणे जिल्ह्याला हवामान विभागाकडून रेड अलर्ट देण्यात आला आहे. महानगरपालिकेने (TMC) एक्सवर एक पोस्ट केली आहे. त्यामध्ये ठाणे जिल्हाधिकारी आणि जिल्हा दंडाधिकारी यांच्याकडून शैक्षणिक संस्थांना सुट्टी जाहीर करण्यासंबंधीचे अधिकृत आदेश देण्यात आला आहे.
ठाणे जिल्ह्यात सुरू असलेल्या अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर, ठाणे जिल्ह्यातील सर्व व्यवस्थापनांच्या आणि सर्व माध्यमांच्या, सर्व प्रकारच्या शाळांना दि. २० ऑगस्ट, २०२५ रोजी सुटी जाहीर करण्यात आली आहे. pic.twitter.com/5AFX9FX8eP
— Thane Municipal Corporation – ठाणे महानगरपालिका (@TMCaTweetAway) August 19, 2025
३ पनवेल महानगरपालिकेनेही परिपत्रक पोस्ट करून त्यांच्या हद्दीतील शाळांना सुट्टी असल्याचे सांगितले. नवी मुंबई महानगरपालिका (NMMC) आणि पालघर महानगरपालिकेनेही त्यांच्या हद्दीतील शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी जाहीर केली आहे. पालघरमध्ये रेड अलर्ट देण्यात आला असल्याने येथील शाळांना सुट्टी असल्याचं जाहीर करण्यात आलं आहे.
(सोशल मीडियावरील कोणतीही माहिती खरी न मानता शाळेच्या व्यवस्थापनासाठी संपर्क साधणं योग्य ठरेल.)





