ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते बाबा आढाव यांचं निधन; वयाच्या 89 व्या वर्षी अखेरचा श्वास

ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते बाबा आढाव यांचे निधन झाले आहे. वयाच्या 89 व्या वर्षी त्यांनी पुण्यात अखेरचा श्वास घेतला आहे. ते गेल्या काही दिवसांपासून आजारी होते.

ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते बाबा आढाव यांचे निधन झाले आहे. वयाच्या 89 व्या वर्षी त्यांनी पुण्यात अखेरचा श्वास घेतला आहे. ते गेल्या काही दिवसांपासून आजारी होते. त्यांच्यावर पुण्यातील पूना हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू होते. आज त्यांनी जगाचा निरोप घेतला. बाबा आढाव हे केवळ एक ज्येष्ठ समाजसेवक नव्हते तर सत्यशोधक विचारांचे निष्ठावान अनुयायी आणि कष्टकऱ्यांचे नेते होते. त्यांनी असंघटित आणि वंचित कष्टकरी मजुरांचे संघटन करून त्यांना न्याय, सामाजिक सुरक्षा आणि सन्मान मिळवून देण्यासाठी आयुष्यभर काम केले.

समाजवादी विचारांचा नेता राज्याने गमावला !

बाबा आढाव यांना गेल्या 10 ते 12 दिवसांपासून पुना हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करण्यात आले होते. हृदयरोगतज्ज्ञ डॉ. अभिजित वैद्य व तज्ज्ञ डॉक्टरांच्या देखरेखीखाली त्यांच्यावर आवश्यक ते उपचार सुरू होते. उपचार करणाऱ्या डॉक्टरांनी सांगितल्यानुसार त्यांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना आय.सी.यू. मध्ये ठेवण्यात आले होते. अखेर, आज रात्री 8.25 वाजता त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या जाण्याने कष्टकऱ्यांसाठी लढणारा, समाजवादी विचारांचा नेता महाराष्ट्राने गमावल्याची भावना व्यक्त होत आहे.

राजकीय स्थितीवर आढावांची आक्रमक मतं

,शिवसेना आणि राष्ट्रवादीतील फुटीनंतर देशातील आणि राज्यातील राजकीय परिस्थितीवर त्यांनी परखडपणे भाष्य केलं होतं. माणूस सकाळी कुठं असेल अन संध्याकाळी कुठं असेल, सध्या अशी परिस्थिती आहे. कारण त्यांना सत्तेची भूक आहे. पण लक्षात ठेवायला हवं, 140 कोटी जनताच ठरवेल, कोणाचं काय करायचं असं बाबा आढाव म्हणाले. ते म्हणाले की, काळ कठीण आहे, काळाचे भान ठेवा. सध्याचं राजकारण खूप विलक्षण आहे. कॅनडा मधून माझे कुटुंबीय म्हणतायेत की भारतात काय चाललंय नेमकं? आपल्या इथं फक्त सत्तेसाठी सगळं सुरू आहे, असे म्हणत राष्ट्रवादीतील फुटीनंतर बाबा आढाव यांनी देशातील राजकीय परिस्थितीवर भाष्य करत वयाच्या 93 व्या वर्षीही आंदोलन केलं होतं.

गेल्या काही दिवसांपासून आजारी होते. त्यांच्यावर पुण्यातील पूना हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू होते. आज त्यांनी जगाचा निरोप घेतला. बाबा आढाव हे केवळ एक ज्येष्ठ समाजसेवक नव्हते तर सत्यशोधक विचारांचे निष्ठावान अनुयायी आणि कष्टकऱ्यांचे नेते होते. त्यांनी असंघटित आणि वंचित कष्टकरी मजुरांचे संघटन करून त्यांना न्याय, सामाजिक सुरक्षा आणि सन्मान मिळवून देण्यासाठी आयुष्यभर काम केले.


About Author

Rohit Shinde

Other Latest News