मुंबईला पाणीपुरवठा करणारी सात धरणं तुडूंब; धरणांच्या पाणलोट क्षेत्रात मुसळधार पाऊस

Rohit Shinde

मुंबईला पाणीपुरवठा करणारी सातही धरणं सध्या काठोकाठ भरली आहेत. या धरणांमधील एकूण साठा 99.46 टक्क्यांवर पोहोचला आहे. या धरणांच्या पाणलोट क्षेत्रात गेल्या 24 तासांत झालेल्या मुसळधार पावसामुळे धरणांची पाणीपातळी वाढली आहे. त्यामुळे आता आगामी काळात मुंबईकरांना पाणी कपातीपासून दिलासा मिळण्याची शक्यता आहे. मुंबईसाठी ज्या सात धरणांमधून पाणीपुरवठा केला जातो, त्यांपैकी तीन धरणं 100 टक्के क्षमतेने भरली असून उर्वरित धरणातही मुबलक पाणीसाठी उपलब्ध झाला आहे.

मुंबईकरांची पाण्याची चिंता मिटली!

मुसळधार पावसामुळं सध्या मुंबईला पाणीपुरवठा करणारी सातही प्रमुख धरणे 99.70 टक्के भरली असून मुंबईकरांची वर्षभराची पाण्याची चिंता दूर झाली आहे. दररोज तब्बल 4,000 मिलियन लिटर पाणी या सात धरणांतून मुंबईला पुरवले जाते. यात विहार, तुळशी, तानसा, मोडकसागर (वैतरणा), उर्ध्व वैतरणा, भातसा आणि हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे मध्य वैतरणा या धरणांचा समावेश आहे.

सात ही धरणे 99 टक्के भरली असून मुंबई करांची वर्षभराची पाण्याची चिंता मिटली आहे. मुंबईची लोकसंख्या झपाट्याने वाढत असल्याने सध्याची पाण्याची गरज 4,600 मिलियन लिटरवर पोहोचली आहे. या तुटवड्याची पूर्तता करण्यासाठी मुंबई महापालिकेच्या वतीने गारगाई धरण प्रकल्प राबवण्यात येत आहे. या प्रकल्पामुळं सहा गावे बाधित होणार असून त्यांचे पुनर्वसन करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. बाधित गावांची नावे अशी आहेत .  ओगदा, खोडदा, फणसगाव, पाचघर, तिळमाळ आणि आमले. यापैकी ओगदा आणि खोडदा ही गावे पूर्णपणे धरणाच्या पाण्यात बुडतील.

सात धरणांमध्ये मोठा पाणीसाठा

मुंबईसाठी ज्या सात धरणांमधून पाणीपुरवठा केला जातो, त्यांपैकी तीन धरणं 100 टक्के क्षमतेने भरली असून उर्वरित धरणातही मुबलक पाणीसाठी उपलब्ध झाला आहे. या सात धरणांमध्ये एकूण 13,644 अब्ज लिटर क्षमतेपैकी 13,570 अब्ज लिटर (99.46 टक्के) पाणीसाठा झाला आहे. त्यामुळे हा साठा पुढील उन्हाळा आणि पावसाळ्यापर्यंत मुंबईची पाण्याची गरज भागवण्यासाठी पुरेसा ठरू शकतो.

पाणलोट क्षेत्रात जोरदार पाऊस

गेल्या 24 तासांत या सातही धरणांच्या पाणलोट क्षेत्रात जोरदार पावसाची नोंद झाली आहे. यामुळे जलसाठ्यात मोठी वाढ झाली असून अनेक धरणे ओव्हरफ्लो होण्याच्या जवळ पोहोचली आहेत. तीन धरणं 100 टक्के क्षमतेने भरली असून उर्वरित धरणातही मुबलक पाणीसाठी उपलब्ध झाला आहे.

ताज्या बातम्या