धक्कादायक! मुंबईत आरडीएक्स आणि मानवी बॉम्बने एक कोटी लोकांना उडवून देण्याची धमकी; पोलिसांकडून तपास सुरू

34 गाड्यांमध्ये तब्बल 400 किलो आरडीएक्स ठेवले असून 1 कोटी लोकांना उडवून देऊ, अशा स्वरूपाची धमकी मुंबई पोलिसांना देण्यात आली आहे. शहरात अलर्ट जारी करण्यात आला आहे.

मोठी आणि धक्कादायक अशा स्वरूपाची बातमी खरंतर मुंबईतून समोर येत आहे. मुंबईत 34 आत्मघाती हल्लेखोर अर्थात ह्युमन बॉम्ब पेरल्याचा फोन शुक्रवारी आल्याने मुंबई पोलीस हाय अलर्टवर आहेत. 34 गाड्यांमध्ये तब्बल 400 किलो आरडीएक्स ठेवले असून 1 कोटी लोकांना उडवून देऊ, अशा स्वरूपाची धमकी मुंबई पोलिसांना देण्यात आली आहे. पोलिसांकडून या प्रकरणी अलर्ट जारी करण्यात आला असून प्रचंड वेगाने तपास सूरू आहे.

मुंबईत नेमकं काय घडलं?

मुंबईत 34 आत्मघाती हल्लेखोर अर्थात ह्युमन बॉम्ब पेरल्याचा फोन शुक्रवारी आल्याने मुंबई पोलीस हाय अलर्टवर आहेत. ऐन अनंत चतुर्दशीच्या तोंडावर ही धमकी मिळाल्याने एकच खळबळ उडाली आहे. 34 गाड्यांमध्ये तब्बल 400 किलो आरडीएक्स ठेवले असून संपूर्ण शहर हादरवून टाकण्याची सनसनाटी धमकी फोनवर देण्यात आली. पोलिसांना वाहतूक पोलिसांच्या हेल्पलाईनवर धमकीचा फोन आला होता. एका अज्ञात व्यक्तीने फोन करुन शहरात मोठा स्फोट घडवण्याची धमकी दिली. धमकी देणाऱ्याने 34 गाड्यांमध्ये आरडीएक्स ठेवल्याचा दावा केला आहे.

धमकी देणाऱ्याने स्वतःला लष्कर-ए-जिहादी संघटनेचा सदस्य असल्याचे सांगितले. धमकी अनंत चतुर्दशीच्या पूर्वसंध्येला देण्यात आल्यामुळे मुंबईसह राज्यभरात सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आली आहे.

मुंबई अलर्ट; नागरिक भयभीत

शहरात सुरक्षा व्यवस्था अधिक कडक केली आहे. महत्वाच्या ठिकाणी नाकाबंदी करण्यात आली असून वाहनांची तपासणी केली जात आहे. पोलिसांनी नागरिकांना शांत राहण्याचे आवाहन केले आहे. कोणत्याही संशयास्पद वस्तू किंवा व्यक्ती दिसल्यास पोलिसांना माहिती देण्यास सांगितले आहे. धमकी देणाऱ्या व्यक्तीचा शोध सुरू केला आहे. तांत्रिक तपासाच्या आधारे आरोपीचा शोध घेतला जात आहे.

याआधी, सोमवारी, ठाणे जिल्ह्यातील कळवा रेल्वे स्टेशन उडवून देण्याची खोटी धमकी देणाऱ्या 43 वर्षीय व्यक्तीला अटक करण्यात आली होती. त्यामुळे ही धमकी खोटी असावी की काय ? अशा स्वरूपाचा संशय देखील खरंतर पोलीस यंत्रणेकडून व्यक्त केला जात असला तरी तपास सुरू आहे. या काळात नागरिकांना सजग राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.


About Author

Rohit Shinde

Other Latest News