माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी कराडमध्ये पत्रकार परिषद घेऊन आपला संताप व्यक्त केला निवडणूक आयोगाने गोंधळ घातला, याला सरकार जबाबदार आहे, असे त्यांनी म्हटले. दरम्यान, या पत्रकार परिषदेतून आंतरराष्ट्रीय राजकारणावर भाष्य करताना त्यांनी मोठा दावा केला आहे. देशाच्या मराठी माणूस विराजमान होण्याची शक्यता आहे, असे चव्हाण यांनी म्हटले.
लवकरच मराठी माणूस पंतप्रधान होणार -चव्हाण
देशाच्या राजकारणाला धक्का देणारी मोठी बातमी सध्या समोर येत आहे. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी आज कराडमध्ये पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत त्यांनी मोठा राजकीय दावा केला आहे. त्यांच्या या वक्तव्यानं राजकीय वर्तुळात खळबळ उडाल्याचं पाहायला मिळतंय. या महिन्यात एक मराठी माणूस पंतप्रधान होऊ शकतो. असा खळबळजनक दावा पृथ्वीराज चव्हाण यांनी केलाय. पृथ्वीराज चव्हाण यांच्या या खळबळजनक विधानानंतर राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे. यावेळी बोलताना त्यांनी निवडणूक आयोगाच्या कारभारावर देखील ताशेरे ओढले आहेत. निवडणूक आयोगाने घातलेल्या गोंधळाचा त्यांनी निषेध नोंदवला. निवडणूक आयोगानं हा जो सगळा सावळा गोंधळ घातलाय त्याला राज्य सरकार जबाबदार असल्याचा आरोप देखील यावेळी त्यांनी केला.

माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाणांचं मत नेमकं काय?
एपस्टाईन फाईल्सवरुन अमेरिकेत गेल्या 6 महिन्यांपासून मोठा गदारोळ आहे, ती फाईल उघड झाल्यावर भारताच्या राजकारणावरही त्याचा विपरीत परिणाम होऊ शकतो. कदाचित महिनाभरात मराठी माणूस देशाचा पंतप्रधान होऊ शकतो, असे खळबळजनक वक्तव्य माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी पत्रकारांशी बोलताना केले. पृथ्वीराज चव्हाण यांच्या या वक्तव्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली असून
अमेरिकेत मोठा उद्योगपती. जेफ्री अॅमस्टिन त्याचं नाव आहे. त्या माणसाबद्दलचा हा विषय आहे. त्याने कायदा मोडला. त्याने खूप बेकायदेशीर कारवाया केल्या. त्यात सर्व राजकीय पक्षाच्या नेत्यांना गुंतवायचं आणि भानगडी करायला लावायच्या असा तो विषय आहे. सर्व मोठ्या राजकीय नेत्यांची नावे अमेरिकेत आली आहेत. त्यात राष्ट्रपती ट्रम्प यांचं देखील नाव आहे. त्यामुळे कदाचित ट्रम्प यांना राजीनामा द्यावा लागेल. तिकडे निवडणूक आयोगाचे फार कडक निकष आहेत. ट्रम्प यांनी राजीनामा देणं हा त्यांचा विषय आहे.अमेरिकेची संसद त्यांच्या मागे लागली आहे. नावं खुलं करण्यास सांगत आहे.
पण ट्रम्प करत नाहीत. संसद ट्रम्प यांच्या पाठिमागे सहा महिन्यापासून असून 10 हजार कागदपत्रं संसदेने ताब्यात घेतले आहेत. संसद ही कागदपत्रं उघड करू शकते. सुब्रमण्यम स्वामी यांनी हा व्हिडीओ केला आहे, अशी माहिती पृथ्वीराज चव्हाण यांनी दिली. तसेच, आज त्यावर संसदेत गदारोळ होऊ शकतो. त्यामुळे, मी फक्त म्हटलं मराठी माणूस पंतप्रधान होण्याची शक्यता आहे, त्यातून काय अर्थ काढायचा तो काढा, असं पृथ्वीराज चव्हाण यांनी म्हटलं.











