Soyabean Price: डिसेंबरच्या दुसऱ्या आठवड्यात सोयाबीनच्या दराने उच्चांक गाठला; दरांची काय स्थिती ?

Rohit Shinde

सोयाबीन बाजारात सध्या दरांमध्ये मोठी चढ-उतार पाहायला मिळत आहे. नव्या हंगामातील आवक वाढत असताना काही बाजार समित्यांमध्ये दर वाढताना दिसत आहेत, तर काही ठिकाणी घसरण नोंदली जात आहे. मात्र एकुणच राज्यातील बाजार समित्यांमध्ये सध्या दरामध्ये चांगली सुधारणा पाहायला मिळत आहे. दर वाढताना दिसत आहेत. महाराष्ट्रातील बाजार समित्यांमध्ये आता सोयाबीनच्या दरामध्ये चांगली सुधारणा होताना दिसत आहे. राज्यातील सोयाबीन बाजारात सध्या तेजीचे वातावरण पाहायला मिळत असून शेतकऱ्यांसाठी दिलासादायक परिस्थिती निर्माण झाली आहे.

राज्यातील सोयाबीन उत्पादकांना दिलासा

राज्यातील सर्वात मोठी आवक लातूर बाजार समितीत नोंदवली गेली. येथे 18 हजार 196 क्विंटल इतकी मोठी आवक झाली असून, किमान दर 4,324 रुपये तर कमाल दर 4,620 रुपये नोंदवला गेला. सर्वसाधारण दर 4,500 रुपये राहिला. यावरून लातूर बाजारात मागणी टिकून असून दर्जेदार मालाला चांगला दर मिळत असल्याचे स्पष्ट होते.  वाशीम बाजार समितीने मात्र सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. येथे पिवळ्या सोयाबीनला 6,200 रुपयांचा कमाल दर मिळाला असून सर्वसाधारण दर 5,650 रुपये राहिला. कमी आवक आणि उत्तम दर्जामुळे येथे दरात मोठी उसळी पाहायला मिळाली. मंगरुळपीर बाजारातही 5,475 रुपयांचा कमाल दर आणि 5,425 रुपयांचा सर्वसाधारण दर मिळाल्याने या भागात सोयाबीनला मजबूत आधार मिळाल्याचे दिसते.

मात्र काही बाजारांमध्ये कमी दर्जाचा माल आणि जास्त आवक असल्याने दरांवर दबाव दिसतो. छत्रपती संभाजीनगर, वणी, हिंगणघाट आणि वरोरा-शेगाव या बाजारांमध्ये किमान दर 2,000 ते 3,000 रुपयांपर्यंत घसरले आहेत. हिंगणघाट बाजारात 2,756 क्विंटल आवक असूनही सर्वसाधारण दर 3,800 रुपयेच राहिलावरोरा-शेगाव येथे तर 3,500 रुपयांचा सरासरी दर नोंदवण्यात आला.

दरातील वाढीमुळे शेतकऱ्यांमध्ये समाधान

राज्यातील सोयाबीन बाजारात सध्या तेजीचे वातावरण पाहायला मिळत असून शेतकऱ्यांसाठी दिलासादायक परिस्थिती निर्माण झाली आहे. राष्ट्रीय स्तरावर सोयाबीन आणि सोयाबीन तेलाच्या मागणीत लक्षणीय वाढ झाल्याचा थेट परिणाम बाजारभावावर दिसून येत आहे. अवघ्या दोन दिवसांतच सीड क्वालिटी सोयाबीनच्या दरात जवळपास एक हजार रुपयांची वाढ नोंदवली गेली असून, मील क्वालिटी सोयाबीनच्या दरातही मोठी उसळी दिसत आहे. यामुळे सोयाबीनचे दर लवकरच हमी भावाचा टप्पा ओलांडतील, अशी शक्यता बाजार तज्ज्ञ व्यक्त करत आहेत.

मागील काही दिवसांपासून राज्यातील बहुतांश बाजार समित्यांमध्ये सोयाबीनची आवक घटत चालली आहे. शेतकऱ्यांकडील साठा मर्यादित राहिला असून अनेक शेतकरी सध्या भाववाढीच्या अपेक्षेने माल बाजारात आणत नाहीत. याउलट प्रक्रिया उद्योग, तेल उत्पादक कंपन्या आणि व्यापाऱ्यांकडून सोयाबीनची मागणी वाढत आहे. या मागणी-पुरवठ्यातील तफावतीमुळे दराला जोरदार आधार मिळत असल्याचे चित्र आहे.

ताज्या बातम्या