Soybeans Import : दक्षिण आफ्रिकेतून 1 लाख टन सोयाबीन भारतात येणार?? सरकारचे धोरण शेतकऱ्याच्या मुळावर

सोयाबीन हे महाराष्ट्रात उत्पादित होणारे एक महत्त्वाच पीक आहे. खास करून मराठवाडा आणि विदर्भात सोयाबीनचे मोठ्या प्रमाणात घेतलं जाते.

Soybeans Import : एकीकडे आधीच हमीभावापेक्षा कमी दरात सोयाबीनची विक्री करावी लागत असल्याने विदर्भ आणि मराठवाड्यातील सोयाबीन उत्पादक शेतकरी अडचणीत आहे. त्यातच आता केंद्र सरकारचे धोरण थेट शेतकऱ्यांच्या मुळावर उठल आहे. दक्षिण आफ्रिकेतून मराठवाड्यात तब्बल 1 लाख टन सोयाबीनची आयात होणार असल्याची चर्चा सुरु आहे. त्यामुळे राज्यातील सोयाबीनचे दर घसरण्याची शक्यता निर्माण झाली आहे. शेतकऱ्याला हा सर्वात मोठा झटका असल्याचं बोललं जातंय. आधीच उत्पादनाचा खर्च जास्त आणि मिळणारा फायदा कमी अशी तोट्याची शेती शेतकऱ्याला करावी लागतेय.  त्यातच आता थेट आफ्रिकेतील सोयाबीन भारतात येणार असल्याने देशातील बळीराजा पुन्हा एकदा संकटात सापडला आहे.

दरावर मोठा परिणाम होणार – Soybeans Import

खरं तर लोकसभा निवडणुकीपूर्वी सोयाबीनला चांगला हमीभाव देऊ, सोयाबीन उत्पादक शेतकऱ्याचं उत्पन्न दुप्पट करू अशा बारा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्रात येऊन केल्या होत्या. मात्र आता याच मोदींच्या सरकारकडून दक्षिण आफ्रिकेतील सोयाबीन देशात आणले जात आहे.  व्यापाऱ्यांच्या माहितीनुसार, दक्षिण आफ्रिकेतून तब्बल एक लाख टन सोयाबीनचा आयात सौदा पूर्ण करण्यात आला आहे. हा माल लवकरच मुंबई बंदरात दाखल होणार आहे. आयात सोयाबीनचा अंदाजे दर 4870 रुपये प्रति क्विंटल पडत असल्याने स्थानिक बाजारपेठेला थेट फटका बसणार आहे. कारण यामुळे सरकारने जाहीर केलेला 5,328 रुपये हमीभाव मिळणे कठीण होईल आणि स्थानिक शेतकऱ्याचं नुकसान होणार आहे. Soybeans Import

सोयाबीन महत्वाचे पीक

सोयाबीन हे महाराष्ट्रात उत्पादित होणारे एक महत्त्वाच पीक आहे. खास करून मराठवाडा आणि विदर्भात सोयाबीनचे मोठ्या प्रमाणात घेतलं जाते. अनेक शेतकऱ्यांचे अर्थकारण हे सोयाबीन वर अवलंबून असते. आकडेवारीनुसार, राज्यात देशाच्या एकूण सोयाबीन उत्पादनापैकी 40 टक्के उत्पादन घेतले जात असून देशात सोयाबीन उत्पादनात महाराष्ट्राचा दुसरा क्रमांक आहे.


About Author

Asavari Khedekar Burumbadkar

Other Latest News