Special Trains : रेल्वे विभागाचा मोठा निर्णय!!मुंबई, पुणे, नागपूरसाठी स्पेशल ट्रेन धावणार

सध्याचे दिवस हे हिवाळ्याचे असून याच महिन्यात ख्रिसमस सारखा महत्त्वाचा सण साजरा होतोय, तर दुसरीकडे नवीन वर्षाची सुद्धा आतुरतेने वाट बघितली जाते. साहजिकच या काळात रेल्वेने प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या जास्त असते.

Special Trains : सध्याचे दिवस हे हिवाळ्याचे असून याच महिन्यात ख्रिसमस सारखा महत्त्वाचा सण साजरा होतोय, तर दुसरीकडे नवीन वर्षाची सुद्धा आतुरतेने वाट बघितली जाते. साहजिकच या काळात रेल्वेने प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या जास्त असते. परिणामी प्रवाशांना वाढत्या गर्दीला सामोरं जावं लागते. याच पार्श्वभूमीवर रेल्वे विभागाने मुंबई, नागपूर आणि पुण्यासाठी  विशेष ट्रेन सोडल्या आहे. आज आपण या ट्रेनचे वेळापत्रक जाणून घेऊया.

मुंबई नागपूर स्पेशल ट्रेन (Special Trains)

गाडी क्रमांक ०१००५ छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस-नागपूर साप्ताहिक विशेष एक्सप्रेस दर शनिवारी सीएसएमटीहून रात्री ००.३० वाजता निघेल आणि दुपारी २ वाजता नागपूरला पोहोचेल. तर परतीच्या प्रवासात हीच ट्रेन गाडी क्रमांक ०१००६ नागपूर-छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस साप्ताहिक विशेष एक्सप्रेस दर रविवारी नागपूरहून ०७.२० वाजता निघेल आणि सीएसएमटीला १८.५० वाजता पोहोचेल. या ट्रेन मध्ये ०२ सेकंड एसी, ०८ थर्ड एसी, ०६ स्लीपर, ०४ जनरल आणि ०२ गार्ड-कम- लगेज व्हॅन, एकूण २२ कोच असतील. मुंबई ते नागपूर ट्रेन दादर, कल्याण, नाशिक रोड, मनमाड, भुसावळ, मलकापूर, शेगाव, अकोला, बडनेरा, वर्धा आणि अजनी रेल्वे स्थानकावर थांबेल. ही गाडी १२ डिसेंबर, २७ डिसेंबर २०२५ आणि ३ जानेवारी २०२६ रोजी सीएसएमटीहून आणि १३ डिसेंबर, २८ डिसेंबर २०२५ आणि ४ जानेवारी २०२६ रोजी नागपूरहून धावेल. Special Trains

पुणे नागपूर ट्रेन

ट्रेन क्रमांक ०१४०१ पुणे-नागपूर साप्ताहिक विशेष एक्सप्रेस दर शुक्रवारी पुण्याहून रात्री २१.२० वाजता निघेल आणि दुसऱ्या दिवशी सकाळी ०९.५० वाजता नागपूरला पोहोचेल. तर परतीच्या प्रवासात ट्रेन क्रमांक ०१४०२ नागपूर-पुणे साप्ताहिक विशेष एक्सप्रेस दर रविवारी नागपूरहून सकाळी ११.०५ वाजता निघेल आणि रात्री २३.४५ वाजता पुण्याला पोहोचेल. या ट्रेनच्या रचनेबद्दल सांगायचं झाल्यास, यामध्ये ०४ थर्ड एसी, ०८ स्लीपर, ०४ जनरल आणि ०२ गार्ड-कम-लगेज व्हॅन, एकूण २२ कोच असतील. हि विशेष ट्रेन दौंड, अहमदनगर, बेलापूर, कोपरगाव, मनमाड, भुसावळ, मलकापूर, शेगाव, अकोला, बडनेरा, वर्धा आणि अजनी रेल्वे स्थानकावर थांबेल. ही ट्रेन १२ डिसेंबर, २६ डिसेंबर २०२५ आणि २ जानेवारी २०२६ रोजी पुण्याहून आणि १४ डिसेंबर, २८ डिसेंबर २०२५


About Author

Asavari Khedekar Burumbadkar

Other Latest News