दिवाळीच्या तोंडावर महाराष्ट्रातील सर्वसामान्य प्रवाशांना मोठा झटका बसला आहे. राज्य एसटी महामंडळाने दिवाळीच्या तोंडावर प्रवासी भाड्यात वाढ (ST Bus Ticket Price Hike) केली आहे. ही दरवाढ 10 टक्क्यांनी केली असून 15 ऑक्टोबर ते 5 नोव्हेंबरपर्यंत जारी असेल. म्हणजेच काय तर दिवाळीच्या निमित्ताने एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाणाऱ्या प्रवाशांच्या खिशाला या दरवाढीमुळे चाप बसणार आहे.
दिवाळीच्या सणाच्या पार्श्वभूमीवर मुंबई पुणे सारख्या मोठ्या शहरात असणारे अनेक चाकरमानी आपल्या मूळ गावी जातात.दिवाळीच्या काळात लहान मुलांच्या शाळेलाही सुट्टी असते. त्यामुळे याच काळात काही कुटुंब फिरायला जाण्याचाही प्लॅन करतात. साहजिकच एसटी बसेस वरील ताण वाढतो. प्रवाशांची मोठी गर्दी बघायला मिळते. बसमध्ये बसण्यासाठी लोकांची अक्षरश: झुंबड उडते. त्यामुळे एसटीला अतिरिक्त बसेस सुद्धा सोडाव्या लागतात.

एसटीच्या तिजोरीत वाढ होणार – ST Bus Ticket Price Hike
एसटीचा प्रवास हा सर्वात सुरक्षित प्रवास मानला जातो. परंतु आता या एसटीच्या भाडे वाढीमुळे सर्वसामान्य प्रवाशांचं कंबरड मोडणार आहे. दिवाळीच्या काळात प्रवाशांचा वाढणारा ओघ लक्षात घेता एसटी महामंडळाच्या तिजोरीत वाढ व्हावी यासाठी हा दरवाढी चा निर्णय घेण्यात आला आहे. ST Bus Ticket Price Hike
१४ ऑक्टोबर २०२५ च्या मध्यरात्रीपासून प्रवास सुरु करणाऱ्या प्रवाशांना सुधारीत दराने तिकीट आकारणी केली जाणार आहे. तसेच ज्या प्रवाशांनी आगाऊ आरक्षण केले असेल, अशा प्रवाशांकडून त्या आरक्षण तिकिटाचा जुना तिकीट दर आणि नवीन तिकीट दर यातील फरक वाहकाने वसूल करावयाचा आहे
आता किती असणार नवीन भाडे –
महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाने घेतलेल्या निर्णयानुसार, वातानुकूलित शिवनेरी आणि शिवाई बसेस सोडता सर्वच बसेससाठी 10 टक्के दरवाढ लागू करण्यात येत आहे. त्यामुळे, प्रवाशांना या भाडेवाढीचा फटका बसणार आहे. नव्या भाडेवाढ निर्णयानुसार, जिथं 100 रुपये भाडे (तिकीट) होते, तिथं आता 110 रुपये दर आकारले जाऊ शकतात. तर लांबचा प्रवास करणाऱ्या प्रवाशांना एसटी भाडे वाढीचा सर्वात मोठा फटका बसणार आहे.











