राजधानी मुंबईतील पवईत एका व्यक्तीने अनेक मुलांना ओलीस ठेवल्याची धक्कादायक घटना घडली आहे. ओलीस ठेवण्यात आलेली सर्व मुले 15 वर्षांखालील असून 20 ते 22 मुला-मुलींना एका खोलीत बंद करुन ठेवण्यात आले होते. गेल्या पाच दिवसांपासून या भागात शूटिंग ऑडिशन चालू असल्याने ही मुले येथे येत आहेत. मात्र, आज सर्व मुलांना ओलीस ठेवून संबंधित आरोपी किडनॅपरने व्हिडिओद्वारे माहिती दिली. याबाबत माहिती मिळताच घटनास्थळी पोलीस आणि NSG कमांडो पोहोचले. त्यानंतर अग्निशमन दल आणि पोलिसांच्या मदतीने अखेर ओलीस ठेवणाऱ्या व्यक्तीला ताब्यात घेत मुलांची सुटका करण्यात आली.
पवईत माथेफिरूचा अजब कारनामा
मिळालेल्या माहितीनुसार, पवई येथील आर.ए. स्टुडिओमध्ये एका ऑडिशनसाठी सुमारे 100 लहान मुले जमली होती. याच दरम्यान, रोहितने त्यापैकी सुमारे 20-25 मुलांना ओलीस बनवले. या सर्व मुलांचे वय हे 15 च्या जवळपास होते. पोलिसांच्या सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार रोहित हा मानसिकरित्या अस्वस्थ आहे. जिथे मानसिकरित्या अस्वस्थ असलेल्या एका व्यक्तीने ऑडिशनसाठी आलेल्या काही लहान मुलांना बंधक बनवले. या घटनेची माहिती मिळताच परिसरात एकच खळबळ माजली आणि तातडीने विशेष बचाव मोहीम सुरू करण्यात आली.

घटनेची माहिती मिळताच मुंबई पोलीस दलाचे जवान आणि विशेष कमांडो (Special Commandos) तातडीने घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी सर्वप्रथम आरोपीशी बोलणी सुरू केली. आरोपी काही विशिष्ट प्रश्नांची उत्तरे मागत होता, ज्याचा प्रतिसाद देऊन मुलांना सुरक्षित सोडवण्यासाठी पोलीस प्रयत्न करत होते. विशेष कमांडो पथकांनी त्वरीत कारवाई करत आपला ऑपरेशन सुरू केले आणि सर्व ओलीस विद्यार्थ्यांची सुटका केली. तसंच आरोपी रोहितला ताब्यात घेण्यात आले.
आरोपीची व्हिडिओमधून काय मागणी?
रोहित आर्य असं मुलांना ओलीस ठेवलेल्या आरोपीचं नाव असून माझ्या काही मागण्या आहेत. मी आत्महत्या करण्याऐवजी या मुलांना बंदी बनवलं आहे, असं रोहित आर्यने व्हिडिओच्या माध्यमातून म्हटलं आहे. मी दहशतवादी नाही, माझ्या काही साध्या मागण्या आहेत. मला संवाद साधायचा आहे, काही बोलायचं आहे, मला काही लोकांशी बोलायचं आहे, त्यांना प्रश्न विचारायचे आहेत असं रोहित आर्यने म्हटलं आहे.
Powai में बच्चों को बंधक बनाने का युवक ने किया दावा… रोहित आर्य बताया जा रहा है युवक का नाम… कहा मैं आतंकी नहीं, खबरों के मुताबिक मानसिक रूप से कमजोर बताया जा रहा है रोहित #breakingnews pic.twitter.com/wUqaV05wvw
— MP Breaking News (@mpbreakingnews) October 30, 2025











