भारतीय रेल्वे ही देशाची जीवनरेखा मानली जाते. देशाच्या प्रत्येक कोपऱ्यात जोडणारे सर्वात मोठे आणि स्वस्त वाहतूक साधन म्हणजे रेल्वे होय. ग्रामीण भागातील लोकांपासून ते शहरातील प्रवासी, कामगार, विद्यार्थी, व्यापारी अशा सर्वच घटकांसाठी रेल्वे प्रवास सोयीचा आणि परवडणारा आहे. दररोज लाखो प्रवासी रेल्वेच्या माध्यमातून आपल्या गंतव्यस्थानी पोहोचतात.
रेल्वेच्या वेळापत्रकातील नियमितता, विविध वर्गातील आसनव्यवस्था, ऑनलाइन बुकिंगची सुविधा आणि सुरक्षित प्रवास या सर्व कारणांमुळे प्रवाशांची रेल्वेवर विशेष पसंती आहे. अशा परिस्थितीत आता मुंबईवरून मिरजमार्गे बंगळुरूला प्रवास करू इच्छिणाऱ्या प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे. मुंबई–बेंगळुरू सुपरफास्ट एक्सप्रेस आता मिरज मार्गे धावणार आहे. केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी यांच्या पाठपुराव्यानंतर हा निर्णय घेण्यात आला असून या नव्या मार्गामुळे बेळगाव, हुबळी, धारवाड आणि सांगली परिसरातील प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे.

मुंबई-मिरज-बंगळुरू सुपरफास्ट एक्स्प्रेस
ल्वे मंत्रालयाकडून महाराष्ट्रातील प्रवाशांसाठी एक दिलासादायक बातमी आली आहे. तब्बल तीन दशकांपासून रखडलेला एक महत्त्वाचा विषय अखेर मार्गी लागला असून राज्याला नव्या एक्सप्रेस ट्रेनची भेट मिळाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मुंबई–बेंगळुरू एक्सप्रेस सुरू करण्याची मागणी गेली अनेक वर्षे करण्यात येत होती. या प्रस्तावासाठी विविध संघटनांनी आणि जनप्रतिनिधींनी रेल्वे मंत्रालयाकडे सातत्याने पाठपुरावा केला होता. अखेर रेल्वे प्रशासनाने ही मागणी मान्य करून नवीन एक्सप्रेस सेवा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे.