पुणे शहरात भीषण अपघाताची घटना घडली असून 5 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. शहरातील नवले पुलावर हा अपघात होऊन दोन ते तीन वाहनांनी पेट घेतल्याची धक्कादायक घटना घडली. या दुर्घटनेत 20 जण जखमी झाल्याचे समजते, पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असून अग्निशमन दलाच्या गाड्याही नवले ब्रीजवर पोहोचल्या आहेत. अपघातातील जखमींना जवळील रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे समजते. दरम्यान, मृतांचा आकडा वाढण्याची भीती आहे. त्यामुळे पुण्यातील नवले पूल मृत्यूचा सापळा सध्या बनला आहे.
अपघात नेमका कसा झाला ?
मुंबई-बंगळुरू महामार्गावर असलेल्या पुण्यातील कात्रजमधील नवले पुलावर हा अपघात झाला आहे. दोन मोठ्या कंटेनरमध्ये कार चेपली आणि त्यातील कारमधील पाच जणांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. तसेच या अपघातानंतर या गाड्यांना प्रचंड मोठी आग भडकली. या दोन कंटेनरमध्ये एक लहान कार दबली गेली. त्यामध्ये एक कुटुंब देखील होतं. अशी माहिती समोर येत आहे. त्याचबरोबर या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाने तात्काळ घटनास्थली धाव घेतली. या अपघातामध्ये पाच जणांचा मृत्यू झाला असून 20 जणांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना रूग्णालयामध्ये दाखल करण्यात आल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. नवले पूल या परिसरामध्ये नेहमीच भीषण अपघात होत असतात. नुकतचं गेल्या आठवड्यात एक अपघात झाला होता.
घटनेनंतर लोकप्रतिनिधींचा संताप
नवले ब्रीजच्या अलिकडे काहीही वाहतूक कोंडी नसले, इथं बसवलेल्या कॅमेऱ्यात कैद वाहनांवर कारवाई होती की नाही, हाही प्रश्न आहे. एनएचयूआयचा हा भोंगळ कारभार आहे, केवळ अपघात झाल्यानंतर नेत्यांचा, आमदार, मंत्र्यांचा पाहणी दौरा होतो. अपघाताच्या विषयावर कुणीही अभ्यासक मार्ग सूचवत नाहीत, असेही मोरेंनी म्हटले. दरम्यान, माजी आमदार रवींद्र धंगेकर यांनीही अपघाताव प्रतिक्रिया देत उच्चस्तरीय चौकशी करण्याची मागणी केली आहे.





